Budh Gochar 2025: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते, ज्यात नवरात्री हा अनेकांच्या आवडीचा सण आहे. अश्विन महिन्यातील नवरात्र भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या नवरात्रीत आदिशक्तीच्या आराधनेसह गरबा, दांडियादेखील खेळला जातो. येत्या २२ सप्टेंबर २०२५ पासून शारदीय नवरात्रीला सुरूवात होईल. या काळात नवरात्रीसह काही ग्रहांचे गोचरही होईल. १५ सप्टेंबर रोजी बुध सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार असून २ ऑक्टोबरपर्यंत तो याच राशीत विराजमान असेल. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.
‘या’ तीन राशींवर असणार बुधाची कृपा
सिंह (Singh Rashi)
बुधाचे राशी परिवर्तन आणि नवरात्रीचा काळ सिंह राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
कन्या (Kanya Rashi)
बुध ग्रहाचे राशी परिवर्तन आणि नवरात्रीचा काळ कन्या राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल.
मकर (Makar Rashi)
बुध ग्रहाचे राशी परिवर्तन मकर राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)