Budh Gochar 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला तर्क-वितर्क, व्यापार, शिक्षण, एकाग्रता, बौद्धिक क्षमता यांचा कारक मानलं जातो. अशातच बुधाच्या स्थितीत झालेल्या बदलाचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो.
यावेळी बुध कर्क राशीत विराजमान आहे. यानंतर बुध ऑगस्टच्या शेवटी सिंह राशीत जाईल. यानंतर १५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी बुध उच्च राशी कन्यामध्ये प्रवेश करेल. बुध ग्रह महिन्यात दोन वेळा राशी परिवर्तन करतो. बुध आपल्या उच्च राशीत प्रवेश करताच काही राशीच्या लोकांना बंपर लाभ मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या, बुधाचा कन्या राशीत प्रवेश कोणत्या ३ राशींना फायद्याचा ठरू शकतो.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे कन्या राशीत भ्रमण अनुकूल असू शकते.अशा परिस्थितीत, या राशीच्या लोकांना प्रचंड यश मिळू शकते. हा काळ विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. जीवनात आनंद येऊ शकतो. तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे. तुम्ही चांगले पैसे कमवाल आणि बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल. वैवाहिक जीवन देखील चांगले राहणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी होऊ शकता.
तूळ राशी (Libra Horoscope)
या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतात. या राशीत बुध बाराव्या घरात असेल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुमचा कल अध्यात्माकडे जास्त असू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही धार्मिक यात्रा करू शकता. मानसिक शांती राहील. करिअरच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर, नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना प्रचंड यश मिळू शकते. सध्याच्या कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगला समन्वय साधता येईल. व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्ही बनवलेली रणनीती प्रभावी ठरू शकते. तुम्हाला मोठी ऑर्डर मिळू शकते. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. जोडीदाराशी चांगला समन्वय राहील. आरोग्य चांगले राहणार आहे.
मकर राशी (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या राशीच्या लोकांसाठी बुधाचा कन्या राशीत प्रवेश फायदेशीर ठरू शकतो. या राशीत बुध नवव्या घरात राहणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. दीर्घकाळापासून प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. कोणत्याही कामात तुमचे प्रयत्न आता यशस्वी होऊ शकतात. यासोबतच, तुम्ही बँकेतून किंवा इतरत्र कर्ज घेण्यात यशस्वी होऊ शकता. करिअरच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला कामाच्या संदर्भात लांबचा प्रवास करावा लागू शकतो. याशिवाय, परदेशात काम करण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या स्पर्धकांना कठीण स्पर्धा देऊ शकता. पैशाच्या बाबतीतही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. उत्पन्न वेगाने वाढू शकते. यासोबतच, तुम्ही बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता.