Budh Gochar 30 August 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला प्रभावशाली ग्रह मानलं जातं. नवग्रहांमध्ये त्याला युवराज म्हटलं जातं. बुध ग्रह बुद्धी, विचारशक्ती, मान-सन्मान, व्यापार, शिक्षण यांसारख्या गोष्टींचा कारक आहे. त्यामुळे बुधाच्या स्थितीत बदल झाल्यास त्याचा परिणाम १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे होतो.

सध्या बुध कर्क राशीत आहे. पण ३० ऑगस्ट २०२५ रोजी तो कर्क सोडून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह ही सूर्याची राशी आहे आणि सूर्य हा बुधाचा मित्र आहे. त्यामुळे बुध सूर्याच्या राशीत गेल्यावर काही राशींच्या लोकांना विशेष फायदा होऊ शकतो.

यावेळी त्यांची अनेक अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात आणि पैशातही वाढ होऊ शकते. चला तर मग, जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा काळ नशीबवाला ठरणार आहे…

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह ३० ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ४ वाजून ३९ मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल आणि १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांपर्यंत या राशीतच राहील.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

या राशीच्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाचे स्वामी असलेले बुध, आता चौथ्या भावात प्रवेश करतील. त्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत फायदा होऊ शकतो. खूप काळापासून थांबलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. आयुष्यात काहीतरी चांगलं घडू शकतं.

नोकरी करणाऱ्या लोकांना चांगला लाभ होऊ शकतो. जमीन-संपत्ती संबंधितही फायदा होईल. भौतिक सुख-सुविधा मिळतील. आईसोबतचे संबंध सुधारतील. तुमच्या वागणुकीतही खूप सकारात्मक बदल दिसून येतील.

तूळ राशी (Libra Horoscope)

या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा सिंह राशीत जाणं फायदेशीर ठरू शकतं. या राशीसाठी बुध हे नवव्या आणि बाराव्या भावाचे स्वामी असून ते आता लाभ भावात गोचर करणार आहेत. त्यामुळे या काळात या राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो.

नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील, ज्यामुळे तुम्ही पैसा साठवू शकाल. तुम्ही ज्या कामात मेहनत करत आहात, त्याचं फळ नक्कीच मिळेल. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे.

मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. आरोग्याच्या दृष्टीनेही बुधाचा हा गोचर तुमच्यासाठी लकी ठरू शकतो. हळूहळू आरोग्यात सुधारणा दिसून येईल. एकूणच, हा काळ तुमच्यासाठी खूप छान जाणार आहे.

मकर राशी (Capricorn Horoscope)

या राशीत बुध हा सहावा आणि भाग्य भावाचा स्वामी होऊन आता आठव्या भावात प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुध तुम्हाला चांगले परिणाम देऊ शकतो.

आयुष्यात खूप दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी कमी होऊ शकतात. तर्कशक्ती वाढेल, त्यामुळे अनेक कामांमध्ये यश मिळू शकतं. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळू शकतं. शत्रूंवर विजय मिळेल. आयुष्यात आनंदाचे क्षण येऊ शकतात.