Budh Ketu Yuti on 30 August: वैदिक ज्योतिषानुसार सध्या सिंह राशीत केतू भ्रमण करत आहेत. त्याच वेळी ३० ऑगस्टला ग्रहांचा राजकुमार बुध देखील सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे ३० ऑगस्टला सिंह राशीत बुध आणि केतू युती होणार आहे. ही युती तब्बल १८ वर्षांनी होत आहे, कारण केतु १८ वर्षांनी पुन्हा सिंह राशीत आले आहेत. या युतीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते.
अचानक धनलाभ होऊ शकतो आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. तसेच धन-संपत्तीत वाढ होण्याचेही योग आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा काळ शुभ आहे.
वृषभ राशी (Taurus Horoscope)
तुमच्यासाठी केतू आणि बुध युती लाभदायक ठरू शकते. कारण हा संयोग तुमच्या राशीपासून चौथ्या स्थानी होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते. तसेच वाहन किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. पितृ संपत्तीचाही लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या सर्जनशीलतेची आणि नेतृत्वगुणांची प्रशंसा होईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या किंवा बढतीची संधी मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी किंवा नेतृत्वाची भूमिका घेण्यासाठी हा योग्य काळ आहे. तसेच या काळात आई आणि सासरच्या मंडळींशी संबंध मजबूत होतील.
तूळ राशी (Libra Horoscope)
केतू आणि बुध यांची महायुती उत्पन्न आणि नफ्याच्या दृष्टीने शुभ ठरू शकते. कारण हा संयोग तुमच्या गोचर कुंडलीत ११व्या स्थानी होत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. तसेच तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचे फळ या काळात मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची संधी मिळेल. या काळात कला, लेखन, संगीत किंवा इतर सर्जनशील क्षेत्रांत तुमची प्रतिभा उजळून दिसेल आणि यश मिळेल. मुलांबाबत आनंददायक बातमी मिळू शकते आणि कुटुंबासोबतचा वेळ सुखदायी ठरेल.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
केतू आणि बुध ग्रहांची युती वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. कारण हा संयोग तुमच्या राशीपासून करिअर आणि व्यवसायाच्या स्थानी होत आहे. या काळात नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच वरिष्ठ आणि सहकर्मचाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या आणि संधी मिळू शकतात. व्यापाऱ्यांसाठी या काळात नवीन कल्पना अमलात आणण्याचा उत्तम काळ आहे. तसेच या काळात तुम्हाला व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात, ज्यामुळे चांगला नफा होऊ शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)