Budh Margi 2024: ज्योतिषशास्त्रात बुध हा शुभ ग्रह मानला जातो. बुध शुभ स्थितीत असल्यामुळे लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊन चांगला आर्थिक लाभ होतो. व्यापार, वाणी, बुद्धीमत्ता, धन संपत्तीचा कारक आणि ग्रहांतील राजकुमार बुध ग्रह चाल बदलतो, तेव्हा काही राशींना खूप फायदा होतो. आर्थिक बाबतीत आणि करिअरमध्ये प्रगती होते. बुध ग्रह एकाच राशीत एक महिना राहतो आणि नंतर आपली चाल बदलतो. आता बुधदेव २५ एप्रिलला संध्याकाळी ५ वाजून ४९ मिनिटांनी मीन राशीमध्ये मार्गी होणार आहेत. बुधाच्या मार्गी स्थितीचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र, यावेळी तीन राशी अशा आहेत, ज्यांना बुधाच्या मार्गीचा फायदा होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया बुधाच्या मार्गीचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा होऊ शकतो.

‘या’ राशींना होणार धनलाभ?

मिथुन राशी

बुध ग्रहाचे मार्गी होणे मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. करिअर आणि व्यवसाय यांसाठी हा काळ अत्यंत चांगला ठरु शकतो. या कालावधीत व्यक्तीच्या प्रगतीचे सर्व दरवाजे आपोआप उघडले जाऊ शकतात. रखडलेले पैसे परत मिळू शकतात. या कालावधीत कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यशप्राप्ती होऊ शकेल. या काळात पद आणि प्रतिष्ठा दोन्हींमध्ये वाढ होऊ शकते.

Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
Shani Vakri 2024
३६५ दिवस ‘या’ ४ राशींना शनिदेव करणार मालामाल? शनि जूनमध्ये वक्री अवस्थेत बलवान होताच होऊ शकतात लखपती
Budh Gochar May 2024
१० मे पासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? २ वेळा बुधदेव गोचर करताच येऊ शकतात सोन्यासारखे दिवस
Shukra Nakshatra Parivartan
४८ तासांनी ‘या’ ४ राशींच्या धन व बँक बँलेन्समध्ये होणार बक्कळ वाढ? शुक्रदेवाच्या नक्षत्र बदलामुळे नशीब अचानक पालटणार
Shani Copper Effect In Gochar Kundali Of These Three Rashi Saturn Effect of Sadesati
शनी निघाले तांब्याच्या पावलांनी, ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत बक्कळ धनलाभ; तुम्हाला मिळेल का पेढे वाटण्याची गोड संधी?
Hanuman Jayanti Wishes 23rd April Rashi Bhavishya Mesh To Meen
हनुमान जयंतीला मारुतीराया मेष ते मीनपैकी कुणाला देणार आर्थिक बळ; तुमच्या राशीच्या नशिबात आज काय घडेल?
Varuthini Ekadashi 2024
४ मे पासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? वरुथिनी एकादशीला ३ ‘शुभ राजयोग’ घडून आल्याने नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

(हे ही वाचा: ३६५ दिवस ‘या’ ४ राशींना शनिदेव करणार मालामाल? शनि जूनमध्ये वक्री अवस्थेत बलवान होताच होऊ शकतात लखपती )

कर्क राशी

बुधदेवाचे मार्गी होणे कर्क राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन घेऊन येणारे ठरु शकते. तुम्हाला व्यवसायात मोठ्या यशासह आर्थिक लाभही मिळू शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. 

मीन राशी

बुधदेवाचे मार्गी होणे मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नवीन संधी मिळू शकतात. विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. प्रलंबित प्रकल्प मार्गी लागू शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)