Budh Uday 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांमध्ये एका ठराविक वेळेनंतर काही बदल होतात, जसे की ते कोणत्या राशीत आहेत किंवा ते अस्त होतात, वक्री होतात, पुन्हा उदयाला येतात किंवा मार्गी होतात. या संपूर्ण गोष्टीचा प्रभाव १२ राशींवर होतो. सध्या व्यापाराचे कारक बुध ग्रह, चंद्राच्या कर्क राशीत अस्त अवस्थेत आहेत. पण, ११ ऑगस्ट रोजी सकाळी ४ वाजून ४७ मिनिटांनी ते कर्क राशीतच पुन्हा उदयाला येतील. बुध ग्रहाच्या या उदयामुळे काही राशींच्या लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. चला तर मग या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया…

मेष राशी (Aries Zodiac)

या राशीसाठी तिसऱ्या आणि सहाव्या घराचा स्वामी असलेला बुध ग्रह चौथ्या घरात उदयाला येत आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांना खास फायदा होऊ शकतो. बुध आता अधिक शक्तिशाली होईल आणि त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. आयुष्यातील जुन्या अडचणी आता दूर होऊ शकतात. तसेच रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील. विद्यार्थ्यांसाठीही ही वेळ खूप फायदेशीर ठरेल. एकाग्रता वाढेल, त्यामुळे अभ्यासात लक्ष लागेल. जमीन, प्रॉपर्टीसंबंधित प्रकरणांमध्येही यश मिळू शकते. घरात चाललेले वादविवाद संपतील आणि शांती व समाधान राहील.

कन्या राशी (Virgo Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा उदय फायदेशीर ठरू शकतो, कारण या राशीच्या नफ्याच्या घरात बुध ग्रहाचा उदय होणार आहे, त्यामुळे या लोकांचं आरोग्य चांगलं राहील. जे लोक खूप दिवसांपासून एखाद्या आजाराने त्रस्त होते, त्यांना आता हळूहळू आराम मिळू शकतो. कामाच्या ठिकाणीही चांगला फायदा होऊ शकतो. तुमच्या कामामुळे पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. एखादी मोठी जबाबदारीही तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. व्यापारातही लाभ होण्याचे योग आहेत. जमीन किंवा घरासंबंधीच्या कामात यश मिळू शकतं. भावंडांसोबत वेळ चांगला जाईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. मित्रांसोबतही आनंदी वेळ जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनू राशी (Sagittarius Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा उदय होणं अनुकूल ठरू शकतं. बुध या राशीच्या सप्तम आणि कर्म भावाचा स्वामी असून, ते आता आठव्या भावात उदयाला येत आहेत, त्यामुळे या लोकांना अचानक पैशांचा फायदा होऊ शकतो. अडलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. आयुष्यात आनंदाचे क्षण येऊ शकतात. शत्रूंवर विजय मिळू शकतो. समाजात मान-सन्मान मिळू शकतो. तसेच वैवाहिक जीवनही सुखद आणि शांततेने भरलेलं असेल.