Budha Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीत राशी बदल करतो. यावेळी अनेक ग्रह गोचर आणि नक्षत्र बदलतात, ज्याचा सर्व राशींच्या जीवनावर परिणाम होतो. याचप्रमाणे बुद्धीचा दाता मानला जाणारा बुध ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी आणि वेळोवेळी नक्षत्रही बदलतो. अशाप्रकारे २० जानेवारी रोजी दुपारी ३.४८ वाजता बुध पूर्वाषाधा नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे आणि दोन्ही ग्रहांमध्ये मैत्रीची भावना आहे. अशा स्थितीत १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर नक्कीच काही ना काही प्रभाव पडेल. चला जाणून घेऊया बुध राशीच्या बदलामुळे कोणत्या राशींचे भाग्य उजळेल…

मेष राशी

पूर्वाषाढा नक्षत्रात बुधाचा प्रवेश मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. अशा स्थितीत या राशीच्या लोकांचा कल अध्यात्माकडे अधिक असू शकेल. याचबरोबर धार्मिक कार्यक्रमातही उत्साहाने सहभागी होऊ शकतात. यातून उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. अनेक काळापासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता, मित्र किंवा कुटुंबासह सहलीला जाण्याचा योग येऊ शकतो.

मिथुन राशी

मिथुन राशीमध्ये पूर्वाषाढा नक्षत्रात बुध सप्तम भावात प्रवेश करेल. अशा परिस्थितीत बुधाचे गोचर या राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बँक बॅलन्स वाढू शकतो. परदेश प्रवासाची इच्छाही पूर्ण होऊ शकते. जर तुम्ही परदेशात व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर असे करणे फायदेशीर ठरू शकते. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवता येऊ शकतो. यामुळे जीवनात आनंद येईल. विशेषतः महिलांना विशेष लाभ मिळू शकतो.

Rajyog 2024 : तब्बल ५० वर्षांनंतर जानेवारीत जुळून येणार तीन राजयोग; ‘या’ राशीच्या लोकांना होणार धनलाभ

तुळ राशी

पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर तुळ राशीत बुध तिसऱ्या भावात असणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांची विचारशक्ती वाढू शकते. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यशासोबतच आर्थिक लाभही मिळू शकेल. यासह काही सर्जनशील गोष्टी करण्याचा तुमचा उत्साह वाढेल. तुमच्या बोलण्याच्या क्षमतेवर तुम्ही कामात प्रगती करू शकता. एकंदरीत पूर्वाषाढा नक्षत्रात बुधाचा प्रवेश लाभदायक ठरू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)