Budh Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला ग्रहांचा राजा मानले जाते. तसेच तो शिक्षण, वाणी, वादविवाद, व्यवसाय, एकाग्रता यांचा कारक ग्रह मानले जातात, जो एका विशिष्ट कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदल करतो. ज्याचा प्रभाव निश्चितच १२ राशींच्या जीवनात दिसून येतो. यात बुध ७ मे रोजी मेष राशीत प्रवेश करेल, याच दिवशी तो केतूच्या अश्विनी नक्षत्रात प्रवेश करेल. बुधाच्या नक्षत्र बदलाने काही राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभही मिळू शकतो. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशींबद्दल…

वैदिक पंचागानुसार, बुध ७ मे रोजी पहाटे ४ वाजून १३ मिनिटांनी अश्विनी नक्षत्रात प्रवेश करेल आणि सुमारे ७ दिवस तो या राशीत राहिल्यानंतर१५ मे रोजी भरणी नक्षत्रात प्रवेश करेल.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचा नक्षत्र प्रवेश फलदायी ठरु शकतो. या काळात त्यांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेद्वारे तुम्हाला अनपेक्षित आर्थिक फायदा मिळू शकतो. पण पैशांशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घेतले तर बरे होईल. यासह तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकेल. तुमचे संवाद कौशल्य चांगले होऊ शकते. तुम्ही पैसे वाचवण्यातही यश मिळू शकते. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येऊ शकतात.

तुळ

बुधाचा अश्विनी नक्षत्रातील प्रवेश तुळ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरु शकतो.या काळात तुळ राशीच्या लोकांना खूप फायदे मिळू शकतात. परदेशाशी संबंधित बाबींमध्ये फायदा होऊ शकतो. तुम्हाला प्रवासाची संधी मिळू शकते, यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहू शकतो. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध निर्माण होऊ शकतात. यासह तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. आर्थिक परिस्थितीच्या बाबतीतही तुम्हाला यश मिळेल, जर तुम्ही काही खबरदारी घेऊन पुढे गेलात तर तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेष

बुध ग्रहाचा अश्विनी नक्षत्रातील प्रवेश मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरु शकतो. या लोकांना अनेक क्षेत्रात लाभ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळू शकेल. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. तुम्हाला अनेक नवीन संधी देखील मिळू शकतात. शिक्षण क्षेत्रातही फायदे मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही संपत्ती जमा करण्यातही यशस्वी होऊ शकता. नोकरीमुळे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हावे लागू शकते.