Budh – Guru Mahayuti 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रह सुमारे १२ वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, यात मे महिन्यात गुरुने मिथुन राशीत प्रवेश केला आहे, याच राशीत ६ जून रोजी तो बुधाशी युती करणार आहे. दरम्यान मिथुन राशीत बुध आणि गुरूच्या महायुतीने काही राशींचे भाग्य उजळू शकते. त्या राशींच्या लोकांच्या संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकते. पण कोणत्या राशींना हा फायदा होऊ शकतो जाणून घेऊ…

मिथुन

गुरु आणि बुध ग्रहाची युती मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारु शकते. कुटुंबाशी असलेले संबंध चांगले राहतील. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतील ज्या तुमच्या करियर ग्रोथसाठीही फायदेशीर ठरतील. हा काळ आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही दिलासा देणारा असेल, जुने आजार बरे होऊ शकतात आणि तुम्हाला मानसिक ताणतणावापासून आराम मिळू शकेल. या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात फायदा मिळू शकेल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी गुरु आणि बुध युती सकारात्मक ठरू शकते. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात विशेष प्रगती साधता येऊ शकते. तसेच, नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्य आहे. त्याच वेळी, व्यावसायिकांना एखाद्या मोठ्या प्रकल्पाचा किंवा क्लायंटचा फायदा होऊ शकतो. वडिलांशी तुमचे संबंध चांगले राहतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वृषभ

गुरु आणि बुध यांच्यातील युती वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव जाणवेल, त्याचबरोबर तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतील. कुटुंबात आनंद राहील आणि नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. तुमच्या दैनंदिन उत्पन्नात वाढ दिसून येईल.