वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा एखाद्या राशीत दोन पेक्षा जास्त ग्रह एकत्र येतात तेव्हा योग तयार होतो. या घडामोडींचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. हा बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. २४ मार्च रोजी बुध मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सूर्य देव आधीच विराजमान आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा हे दोन ग्रह एकाच राशीत असतात तेव्हा बुधादित्य योग तयार होतो. ज्योतिष शास्त्रात हा योग राजयोगाच्या बरोबरीचा मानला जातो. त्यामुळे या योगाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. पण तीन राशी आहेत, त्यांना विशेष फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ: बुधादित्य योगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीतील अकराव्या भावात हा योग तयार होईल. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. राजकारणात सक्रिय असाल तर तुम्हाला पद मिळू शकते. समाजात मान-सन्मान मिळू शकेल. प्रतिष्ठा वाढू शकते.

मिथुन: तुमच्या राशीत करिअर आणि नोकरीचे स्थान असलेल्या दशम भावात बुधादित्य योग तयार होत आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळू शकते. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. मोठा करार निश्चित करू शकाल. राजकारणात सक्रिय असाल तर या काळात तुम्हाला पद मिळू शकते.

Budh Ast: बुध ग्रह कुंभ राशीत अस्त, ‘या’ तीन राशींना घ्यावी लागणार काळजी, जाणून घ्या उपाय

कर्क: बुधादित्य योगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण हा योग तुमच्या राशीतील नवव्या स्थानात असेल. या स्थानाला भाग्यस्थान म्हणतात. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. रखडलेली कामे होतील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. स्पर्धक विद्यार्थ्यांना या काळात चांगले यश मिळू शकते. परीक्षेत अपेक्षित यश मिळू शकते. राजकारणात पद मिळू शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budhaditya yog in meen rashi march 2022 rmt
First published on: 22-03-2022 at 08:50 IST