वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. तसेच मंगळ हा जमीन, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मंगळ आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा या क्षेत्रांवर परिणाम दिसून येतो. अशातच आता मंगळ ३ ऑक्टोबर रोजी शुक्राच्या राशीत प्रवेश करणार असून तो १६ नोव्हेंबरपर्यंत तिथेच राहणार आहे. यामुळे ३ राशीच्या लोकांच्या संपत्तीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे, तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

तूळ रास Tula Zodiac)

मंगळाचा राशी बदल तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हे गोचर तुमच्या राशीत होत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होऊ शकते. तसेच सैन्य, पोलीस आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. या काळात तुमचा मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराशी बिघडलेले संबंध सुधारु शकतात.

धनु रास (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर अनुकूल ठरू शकते. कारण हे गोचर तुमच्या राशीच्या उत्पन्न स्थानी तयार झाले आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच, करिअरशी संबंधित नवीन संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. तर ज्यांचा व्यवसाय निर्यात आणि आयातीशी संबंधित आहे त्यांना यावेळी खूप फायदा होऊ शकतो.

हेही वाचा – २०२३ वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण ‘या’ राशींच्या नशिबात घेऊन येणार सोनेरी पहाट? अचानक बक्कळ धनलाभाची शक्यता

सिंह रास (Leo Zodiac)

मंगळाचे गोचर सिंह राशीच्या तिसऱ्या स्थानी होत आहे. त्यामुळे पैशाच्या गुंतवणुकीबाबत तुम्ही या काळात केलेले नियोजन फायदेशीर ठरु शकते. त्याचबरोबर ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्यांना चांगला नफा मिळू शकतो. तसेच, तुम्हाला करिअर संबंधित कामासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. मंगळ तुमच्या राशीच्या चौथ्या आणि नवव्या स्थांनाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. तसेच, या काळात तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा निर्णय घेऊ शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)