Chanakya Niti News : आनंद आणि दु:ख जीवनाचा भाग आहे. सुखामध्ये आपण खूश राहतो तर दु:खात आपण निराश राहतो. अनेक जण आपल्या वाईट काळात संकटाचा सामना करत पुढे जातात पण काही लोक त्यात अडकतात. जीवनात जर सर्वात वाईट काळ सुरू असेल त्यानंतर चांगली वेळ सुद्धा येते. अशा वाईट काळात आचार्य चाणक्य यांच्या काही नीती फायद्याच्या ठरू शकतात. या नीतींमुळे आयुष्य बदलू शकते. जाणून घेऊ या चाणक्य नीतिच्या या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेच्या आहेत.
सत्य
आचार्य चाणक्य सांगतात की सत्यावर जग कायम आहे. सत्य हे सूर्यासारखे तेजस्वी आणि प्रकाशमय आहे. सत्यावर सर्व आधारीत आहे. त्यामुळे काहीही झाले तरी आपण सत्याचा मार्ग सोडू नये.
लोकांना आनंदी कसे ठेवावे?
एका लोभी व्यक्तीला धन देऊन, अहंकारी व्यक्तीसमोर हात जोडून, मूर्ख व्यक्तीला सन्मान देऊन, ज्ञानी व्यक्तीबरोबर खरं बोलून त्यांना आनंदी ठेवावे.
यशस्वी कसे व्हावे?
बुद्धिमान व्यक्तीने आपल्या इंद्रियांना आपल्या नियंत्रणात ठेवून आपले ध्येय वेळ आणि योग्यतेनुसार पूर्ण करायला पाहिजे.
सर्वात सुखी किंवा आनंदी कोण आहे?
जी व्यक्ती आर्थिक व्यवहार करताना, ज्ञान प्राप्त करताना, स्वयंपाक आणि काम व्यवसाय करताना लाजत नाही, ती सर्वात आनंदी व्यक्ती आहे.
समाधानी कसे राहावे?
एका व्यक्तीने आपल्या पत्नीपासून, देवाने दिलेल्या अन्नापासून आणि धनापासून नेहमी समाधानी राहावे.
कोणत्या गोष्टींपासून कधीही समाधानी न राहावे?
आचार्य चाणक्य सांगतात, व्यक्तीने कधीही शिक्षण घेताना, देवाचे नामस्मरण करताना आणि दान करताना समाधानी राहू नये.
कोणाला आदर मिळतो?
ज्या व्यक्तीजवळ धन असते त्या व्यक्तीजवळ मित्र आणि जवळचे लोक खूप असतात आणि त्याला आदर सुद्धा मिळतो.
देव कुठे आहे?
जसे की फुलामध्ये सुगंध आहे, तीळामध्ये तेल आहे, लाकडात अग्नि आहे, दुधात तूप आहे, ऊसामध्ये गूळ आहे तसेच व्यक्तीच्या आत्मा मध्ये देव आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)