चाणक्य नीतीमध्ये चांगला लीडर अथवा नेता होण्यासाठी एखाद्या व्यक्तीमध्ये कोणते चांगले गुण असेल पाहिजे याबाबत सांगितले. चाणक्यांनी त्यांच्या एका श्लोकामध्ये लीडरची तुलना गरुडबरोबर केली आहे. चाणक्य नीतीमध्ये असे का सांगितले आहे जाणून घेऊ या

गुणैरुत्तमतां याति नोच्चैरासनसंस्थिताः ।
प्रासादशिखरस्थोऽपि काकः किं गरुडायते ॥

या श्लोकामध्ये चाणक्य गुणी व्यक्तीला गरुडाप्रमाणे असल्याचे सांगितले आहे. गुणी आणि चांगला व्यक्तीची योग्यता त्याचे काम आणि वागणुकीतून दिसते, दिखावा केल्यामुळे नव्हे.

हेही वाचा – अशक्यही शक्य करू शकतो व्यक्तीचा ‘हा’ एक गुण ! आचार्य चाणक्यांनी सांगितला यशाचा गुरुमंत्र!

आचार्य चाणक्य सांगतात की, ”मोठया पदावर असलेली व्यक्तीच चांगला लीडर होऊ शकते असे नाही, कोणताहीसामान्य व्यक्ती असला तरी देखील चांगला लीडर होऊ शकतो पण आपल्या कौशल्याच्या जोरावर. म्हणजेच जसे घराच्या छतावर बसल्यामुळे कावळा गरुड होत नाही त्याच प्रमाणे मोठ्या पद मिळाल्याने कोणी धनवान आणि महान होत नाही.”

बुद्धिवान, गुणी आणि समजूतदार व्यक्ती आपल्या गुणाचा दिखावा करत नाही. हे लोक त्या हिऱ्यासारखे असतात जे कोळशाच्या खाणींमध्ये दुरूनच दिसतात. तसेच मोठ्या मोठ्या बाता मारणारे आणि स्वतःचे कौतुक करणारे लोक दुसऱ्यांच्या नजरेतून आपली किंमत कमी करतात.

आचार्य चाणक्य सांगतात, ”ज्या प्रमाणे पौर्णिमेचा चंद्राची दुसरे कोणी घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे चांगले गुण असलेली व्यक्ती जरी धनवान नसली तर पूजनीय असते.”

हेही वाचा – व्यक्तीने ‘या’ तीन परिस्थितींमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा…; जाणून घ्या, काय सांगते चाणक्य नीती ….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चाणक्याने नीती सांगते, ”एक सुंदर फुल फक्त नेत्र सुखं देते, पण एक सुगंधी फुल कित्येक लोकांना प्रसन्नता देते आणि त्याचप्रमाणे त्यांचा ताण कमी करते. एक चांगली व्यक्ती आणि गुण्या व्यक्तीची गुणवत्ता सर्व दिशेला पसरते, त्यांना दिखावा करण्याची गरज नसते.”