How to get Rich Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या पाळल्याने माणूस खूप धन, वैभव आणि यश मिळवू शकतो. त्यांच्या मते काही खास कृती केल्याने माणसाला देवाप्रमाणे समृद्धी आणि मान-सन्मान मिळतो. आजच्या काळात याचा अर्थ असा की- आयुष्यात भरपूर संपत्ती, सन्मान आणि सुख-सुविधा मिळवता येतात. चला तर मग पाहूया, आचार्य चाणक्य यांनी धन, ऐश्वर्य आणि यशाबद्दल काय सांगितले आहे.

मेहनतीनेच मिळतं यश (Chankya on Money)

आचार्य चाणक्यांच्या नीतीनुसार, “स्वतःच्या हातांनी बनवलेली माळ, स्वतः घासलेलं चंदन आणि स्वतः लिहिलेली देवाची स्तुतीच खरं फळ देते.” याचा अर्थ असा की माणसाने कोणतेही काम करताना इतरांवर अवलंबून राहू नये. जेव्हा आपण मेहनतीने एखादं काम करतो, विशेषतः देवाची पूजा, तेव्हा ते काम जास्त फलदायी ठरते. हीच मेहनत पुढे जाऊन माणसाला वैभवशाली बनवते.

जेव्हा गरिबीही त्रास देत नाही

चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य म्हणतात, “जो माणूस कठीण परिस्थितीतही धैर्य सोडत नाही, त्याला गरिबीही दुःख देऊ शकत नाही.” याचा अर्थ असा की जर एखाद्या व्यक्तीकडे पैसा नसलाच, तरी जर त्याने संयम, स्वच्छता आणि आत्मविश्वास टिकवून ठेवला, तर त्याची अवस्था फारशी दुःखद वाटत नाही. स्वच्छ कपडे, ताजं अन्न आणि शिस्तबद्ध वागणं यामुळे माणसाची प्रतिष्ठा जपली जाते. चाणक्य म्हणतात की सौंदर्य नाही, तर संस्कार आणि गुण हेच माणसाची खरी ओळख असते.

गुणांमुळे ओळख बनते, दिखाव्यामुळे नाही

आचार्य चाणक्य असंही म्हणतात की “माणसाची किंमत त्याच्या गुणांवर ठरते, बाहेरच्या दिखाव्यावर नाही.” जर एखाद्या व्यक्तीत नम्रता, ज्ञान आणि समजुतदारी असेल, तर त्याचं रूप, रंग किंवा कपडे महत्त्वाचे नसतात. साधेपणानेही आयुष्य सुंदर होऊ शकतं, फक्त त्यात गुण असणे गरजेचे आहे.

खरी दरिद्रता म्हणजे काय?

चाणक्यांच्या मते, “खरा निर्धन तो नाही ज्याच्याकडे पैसा नाही, तर तो आहे ज्याच्याकडे ज्ञान नाही.” त्यांनी विद्येला सर्वात मोठं धन मानलं आहे. ज्याच्याकडे शिक्षण आणि समज नसते, तो माणूस आयुष्यात खरा दरिद्री असतो. पण ज्याच्याकडे ज्ञान आहे, असा माणूस भलेही भौतिक संपत्तीपासून दूर असला तरीही तो सन्मानित आणि समृद्ध मानला जातो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)