Chanakya Niti: आचार्य चाणक्य ज्यांना कौटिल्य नावाने ओळखले जाते ते फक्त अर्थतज्ज्ञ नव्हे तर एक कुशल राजनितीतज्ज्ञ होते आणि विचारवंत होते. त्यांनी सांगितलेल्या नीति आजही प्रत्येक क्षेत्रामध्ये अमूल्य ज्ञान लपलेले आहे. विशेषत: धन आण यशाशी संबधीत त्यांचे विचार आजच्या काळातही तितकेच प्रासंगिक आहेत. जर तुम्हाला वाटत असेल तर आयुष्यात कधीही आर्थिक तंगी येऊ नये किंवै सतत पैसा मिळत राहावा तर आयुष्यात या चूका कधीही करू नका असे चाणक्य सांगतात.
Chanakya Niti: आळस
चाणक्य नीतिनुसार, जो व्यक्ती आपले काम टाळतो किंवा आळशीपणा करतो त्याच्या जीवन पैसा टिकत नाही. मेहनत आणि वेळेचा योग्य उपयोगच पैसा कमावण्याची गुरूकिल्ली आहे. जे लोक उद्या करेन असे विचार करून काम टाळतात ते आयुष्यातील संधी हळू हळू सोडून देतात आणि पैसा देखील गमावतात.
Chanakya Nit वाईट लोकांची संगत
चाणक्य नीतिनुसार, वाईट संगत व्यक्तीला चुकीच्या रस्त्यावर नेते ज्यामुळे फक्त तो पैसा गमावतोच पण त्याबरोबर प्रतिष्ठा देखील संपवतो. वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहिलेने खर्च वाढतात, चुकीचे निर्णय घेतले जातात आणि गुंतवणूकीतही नुकसान होते.
Chanakya Niti: पैशांचा योग्य वापर करणे
पैसे कमावल्यानंतर जर तुम्ही तुमची योग्य वापर केला न नाही तर तो लवकर संपेल. चाणक्यचा असा विश्वास होता की, पैशाचा वापर हुशारीने केला पाहिजे. दिखाऊपणा, उधळपट्टी आणि चुकीची गुंतवणूक माणसाला हळूहळू गरीब बनवते. पैसे कमवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते टिकवणेही महत्त्वाचे आहे.