चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनी आयुष्याविषयी अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. कुटुंब, मैत्री, समाज, व्यवसाय, राजकारण यावर त्यांनी खास नीती सांगितल्या आहे. त्यांच्या या नीती ‘चाणक्य नीती’ म्हणून ओळखल्या जातात. आजही अनेक लोक आवडीने ‘चाणक्य नीती’ फॉलो करताना दिसून येतात.
‘चाणक्य नीती’मध्ये मैत्रीविषयी चाणक्य सांगतात की काही लोकांसोबत मैत्री करणे खूप महागात पडू शकते, त्यामुळे अशा लोकांशी मैत्री करू नये. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार ‘या’ तीन चुकीच्या सवयींमुळे महिला येऊ शकतात अडचणीत, आजच सावध व्हा; नाही तर…

१. न विश्वसेत् कुमित्रे च मित्रे चाऽपि न विश्वसेत्।
कदाचित् कुपितं मित्रं सर्व गुह्यं प्रकाशयेत्।।

‘चाणक्य नीती’नुसार जे मित्र प्रामाणिक नाहीत त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नये आणि कितीही जवळचा मित्र असला तरी त्यांच्यावर कधीच खूप जास्त विश्वास ठेवू नये.
‘चाणक्य नीती’च्या अध्यायातील सहाव्या श्लोकामध्ये चाणक्य सांगतात की जी व्यक्ती चांगला मित्र नाही त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नये पण जर एखादी व्यक्ती तुमची खूप चांगला मित्र असेल त्याच्यावरही पूर्ण विश्वास कधीच ठेवू नये; कारण जर भविष्यात कोणत्या कारणाने तुमच्यात वैर निर्माण झाले तर तो तुमची सर्व गुपिते इतरांसमोर उघड करू शकतो.

हेही वाचा : ‘या’ राशी पुढील आठवड्यात होणार मालामाल? तुमची रास यात आहे का?

२. परोक्षे कार्यहन्तारं प्रत्यक्षे प्रियवादिनम् ।
वर्जयेत्तादृशं मित्रं विज्ञकुम्भं पयोमुखम् ।।

‘चाणक्य नीती’नुसार, जे मित्र तुमच्यासमोर गोड बोलतात आणि तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतात अशा मित्रांपासून दूर राहावे.
‘चाणक्य नीती’मध्ये दूसऱ्या अध्यायाच्या पाचव्या श्लोकामध्ये चाणक्य यांनी सांगितले आहे की जो मित्र समोर गोड बोलत असेल आणि पाठीमागे तुमची निंदा करून तुमची कामे बिघडवत असेल, अशा मित्रांना आपल्या आयुष्यात ठेवू नका.
चाणक्य म्हणातात की हे त्या भांड्यासारखे आहे, ज्यामध्ये दूध भरलेले असते आणि आतमध्ये विष कालवलेले असते. म्हणून अशा लोकांना मित्र म्हटले जात नाही.

हेही वाचा : ‘या’ 4 राशींच्या लोकांना बुधदेव देणार प्रचंड श्रीमंती? व्यवसायात अपार प्रगतीचा सुवर्णयोग

३. दुराचारी दूरदृष्टिर्दुराऽऽवासी च दुर्जनः।
यन्मैत्री क्रियते पुम्भिर्नरः शीघ्रं विनश्यति।।

‘चाणक्य नीती’च्या दुसऱ्या अध्यायाच्या १९ व्या श्लोकानुसार चांगले व्यक्तिमत्त्व नसणाऱ्या लोकांसोबत जी व्यक्ती मैत्री करते त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. साधुसंतांनुसार दुर्जनांसोबत मैत्री करणे चांगले नसते. म्हणून अशा लोकांसोबत चुकूनही मैत्री करू नये, असे चाणक्य सांगतात.

टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti never do friendship with these type of people read what acharya chanakya said ndj
First published on: 30-05-2023 at 11:57 IST