Chanakya life lessons: चाणक्यनीतिमध्ये अशा कित्येक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या स्विकारून व्यक्ती अनेक संकटातून वाचू शकतो. नाहीतर एक छोटीशी चूक देखील आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. महान अर्थशास्त्रज्ञ, राजनितीतज्ज्ञ, कुटनितीतज्ज्ञ, आणि मार्गदर्शक असलेल्या आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतिशास्त्रातून लोकांना नेहमीच जीवनाविषयी मोलाचा सल्ला देता. चाणक्यनीतिनुसार,काही विशिष्ट लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. आचार्य चाणक्य, या लोक सापापेक्षा जास्त घातक असल्याचे सांगतात. अशी व्यक्ती जर कोणाच्याबरोबर असेल तर जिंकलेला खेळ देखील ते हारतात आणि आयुष्यभर दुखी होतात. अशा लोकांपासून विशेष सावधान राहिले पाहिजे आणि यांच्यापासून दूरच राहा.
चाणक्य सांगतात कोणत्या लोकांपासून दूर राहावं
चाणक्य यांच्या मते, या लोकांचा सहवास सापांबरोबर राहण्याइतकाच धोकादायक आहे. हे कधीकधी तुमचे खूप नुकसान करू शकतात. हे लोक कोण आहेत ते जाणून घ्या.
लोक सापांपेक्षाही अधिक धोकादायक का असतात? (Why Are These People More Dangerous Than Snakes?)
दुष्ट व्यक्ती – दुष्ट व्यक्ती बरोबर राहणे म्हणजे आयुष्यातील संकट येण्यासारखे आहे. दुष्ट व्यक्ती सापापेक्षा जास्त घातक असतात कारण साप तेव्हाच दंश करतो जेव्हा त्याच्या जीवाला धोका असतो पण दुष्ट व्यक्ती नेहमीच तुमच्या वाईटावर टपलेला असतो.
लोभी व्यक्ती : पैशाच्या मागे धावणारा लोभी माणूस कोणत्याही नात्याची पर्वा करत नाही, तो पैशासाठी कोणाचेही नुकसान करू शकतो.
मूर्ख शिष्य – जो गुरु मूर्ख व्यक्तीला शिष्य बनवतो तो स्वतःची प्रतिमा खराब करतो. अशा मूर्ख शिष्यांमुळे त्याला बऱ्याच वेळा अपयश आणि मोठे नुकसान सहन करावे लागते.
हट्टी आणि वाईट वृत्तीचे लोक – हट्टी, रागीट आणि अनैतिक लोकांना कधी काय करावे हे कळत नाही. असे लोक स्वतःसाठी तसेच इतरांसाठीही मोठी समस्या बनतात. म्हणून अशा लोकांपासून दूर राहा.
नकारात्मक लोक – नकारात्मकता हा सर्वात मोठा आजार आहे. तो चांगल्या माणसाला आत्महत्या करण्यास भाग पाडतो. म्हणून नकारात्मक लोकांपासून आणि नकारात्मक विचारांपासून दूर रहा.