Chanakya Niti: सुंदर महिलेशी लग्न करणे हे प्रत्येक पुरुषाचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न सगळ्यांसाठी चांगलं ठरेलच असं नाही. आचार्य चाणक्यांनी खूप वर्षांपूर्वी सुखी वैवाहिक जीवनासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या आजही लागू होतात. चाणक्य म्हणतात की, प्रत्येकासाठी सुंदर महिलेशी लग्न करणे योग्य नसते. अशाने त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. काही लोकांसाठी तर सुंदर महिलेशी लग्न करणे म्हणजे स्वतःचं आयुष्य नरकासमान करून घेणे आहे.

आचार्य चाणक्य त्यांच्या नीतीशास्त्रात म्हणतात, ”सुंदरी भार्या यदि दरिद्रस्य भवनं गच्छति, तदा साक्षात् विषसमं भवति.”

याचा अर्थ असा की जर एखादा गरीब माणूस खूप सुंदर स्त्रीशी लग्न करतो, तर त्याच्यासाठी ती परिस्थिती विषासारखी ठरू शकते. कारण, पैशांअभावी तो माणूस न्यूनगंडाने ग्रस्त होऊ शकतो. समाजातील लोक देखील त्यांच्या नात्याकडे वाईट नजरेने पाहू शकतात. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात अविश्वास आणि तणाव येऊ शकतो. याशिवाय असे काही लोक आहेत ज्यांनी सुंदर महिलेशी लग्न करण्यापासून दूर राहावे.

मूर्ख किंवा कमी बुद्धीचा पुरुष – जो माणूस कमी बुद्धीचा आहे, त्याने सुंदर बाईशी लग्न केल्यास त्याला त्रास होऊ शकतो. तो अशा पत्नीचं संरक्षण करू शकणार नाही, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकणार नाही आणि कामही नीट करू शकणार नाही.

अहंकारी आणि हुकूमशाही स्वभावाचा पुरुष – असे लोक सुंदर स्त्रीला फक्त वस्तू समजतील आणि तिच्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतील. असा माणूस ना स्वतः आनंदी राहील, ना पत्नीला सुखी ठेवू शकेल.

संशयी स्वभावाचे लोक – म्हणतात की शंकेला कोणताही इलाज नाही. जो माणूस प्रत्येक गोष्टीवर शंका घेतो, जर त्याची पत्नी सुंदर असेल तर तो सतत शंकेतच जिवंत राहील. असं करत तो स्वतःचं आणि पत्नीचं दोघांचं जीवन नरक बनवेल.

अती कामुक किंवा असंयमी पुरुष – जे पुरुष खूपच कामुक आहेत, त्यांनी फार सुंदर स्त्रीशी लग्न करू नये. नाहीतर त्यांचे आयुष्य फक्त पत्नीभोवतीच फिरत राहील आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होईल. तसेच असा माणूस महिलेकडे फक्त संपत्ती म्हणून पाहील आणि नात्याचं महत्त्व समजून घेणार नाही.