Chandra grahan effect: हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. पंचांगानुसार ७ सप्टेंबर २०२५ रोजी चंद्रग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण शनीच्या कुंभ राशीत लागणार असून हे ग्रहण भारतातही दिसणार आहे. भारतामध्ये हे ग्रहण ७ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजून ५८ मिनिटांपासून मध्यरात्री १ वाजून २६ मिनिटांपर्यंत असेल. हे ग्रहण लाल रंगाचे असेल ज्यामुळे त्याला ‘ब्लड मून’ देखील म्हटले जाईल. हे ग्रहण १२ राशींपैकी काही राशीच्या महिलांसाठी खूप लाभदायी ठरणार आहे.

चंद्रग्रहण ‘या’ राशीच्या महिलांसाठी भाग्यशाली

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या महिलांसाठी चंद्रग्रहणाचा काळ खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात अचानक धनलाभ होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. सुख-समृद्धीत वाढ होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल.

वृश्चिक (Vruschik Rashi)

वृश्चिक राशीच्या महिलांसाठी चंद्रग्रहणाचा काळ खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. केलेल्या प्रत्येक कामात यश येईल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या महिलांसाठी हे चंद्रग्रहण खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमची प्रगती होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मनातील शंकांचे निरसण होईल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)