Chandra Grahan 2025: हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. पंचांगानुसार (आज) ७ सप्टेंबर २०२५ रोजी पुढील काही तासांत चंद्रग्रहण सुरू होईल. हे चंद्रग्रहण शनीच्या कुंभ राशीत आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्रात लागणार असून हे ग्रहण भारतातही दिसणार आहे. भारतामध्ये ग्रहणाचा सूतक काळ दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांपासून सुरू होऊल जो ८ सप्टेंबर २०२५ च्या मध्यरात्री १ वाजून २६ मिनिटांपर्यंत असेल. तसेच चंद्रग्रहण ७ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजून ५८ मिनिटांपासून मध्यरात्री १ वाजून २६ मिनिटांपर्यंत असेल. धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण कालावधीत देवी-देवतांच्या मंत्रांचा जप करणे किंवा स्तोत्राचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.

चंद्र ग्रहणात काय करायला हवं?

  • चंद्र ग्रहणात देवांच्या मंत्र, स्तोत्रांचे पठण केल्याने त्याचे फळ अनेक पटींने वाढते. त्यामुळे या काळात तुम्ही श्री विष्णूंच्या आणि चंद्राच्या मंत्रांचा जप करू शकता. यामुळे चंद्रग्रहणाचा अशुभ प्रभावही आयुष्यावर पडत नाही.
  • तसेच या काळात तुम्ही महामृत्यूंजय या मंत्राचादेखील जप करू शकता, या मंत्राचा जप केल्याने तुमच्यासह तुमच्या कुटुंबातील व्यक्तिंना सुख-समाधान आणि दीर्घायुष्य प्राप्त होईल.
  • चंद्रग्रहणात पिण्याच्या पाण्यात आणि अन्नात तुळशीचे पाण टाकावे.
  • चंद्रग्रहण समाप्त झाल्यावर अंघोळ करून घरात गंगाजल शिंपडावे.
  • चंद्रग्रहणानंतर गरीब-गरजूंना अन्न दान करू शकता.

चंद्र ग्रहणात या गोष्टी करू नये

  • चंद्र ग्रहणात देवी-देवतांची पूजा करू नये तसेच मूर्तीला स्पर्श करू नये.
  • या काळात अन्न ग्रहण करू नये.
  • धारदार वस्तूंचा वापर करू नये.
  • गर्भवती महिलांनी घरातून बाहेर जाऊ नये.
  • या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये.