Chandra Grahan Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार यावर्षी पितृ पक्षाची सुरुवात ७ सप्टेंबरपासून होणार आहे. या दिवशी न्यायाचे आणि कर्माचे फळ देणारे शनीदेव वक्री अवस्थेत भ्रमण करणार आहेत.

जवळपास ५० वर्षांनंतर शनीदेव पितृ पक्षात वक्री होणार आहेत. तसेच हा चंद्रग्रहण शनीच्या राशीतच होणार आहे. त्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. चला तर मग पाहू या कोणत्या राशींसाठी हा काळ शुभ ठरेल…

मिथुन राशी (Gemini Horoscope)

तुमच्यासाठी शनीदेवाचे वक्री होणे फायदेशीर ठरू शकते. कारण शनीदेव तुमच्या राशीपासून कर्मस्थानात वक्री अवस्थेत आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला कामधंद्यात चांगली प्रगती होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमची कल्पकता आणि नेतृत्व कौशल्य यांची प्रशंसा होईल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी किंवा नेतृत्वाची भूमिका घेण्यासाठी हा काळ चांगला आहे. व्यापाऱ्यांना देखील चांगला नफा मिळू शकतो. तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही हा काळ अनुकूल आहे.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

शनीदेवाचे वक्री होणे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगले ठरू शकते. कारण शनीदेव तुमच्या राशीपासून पंचम स्थानात वक्री अवस्थेत आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला मुलांबाबत शुभ बातमी मिळू शकते. कुटुंबासोबत वेळ घालवणे आनंददायक ठरेल. हा काळ तुमची सर्जनशीलता दाखवण्यासाठी आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी योग्य आहे. तसेच तुमची अडलेली कामे पूर्ण होतील आणि अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मीन राशी (Pisces Horoscope)

तुमच्यासाठी शनीदेवाचे वक्री होणे शुभ ठरू शकते. कारण शनीदेव तुमच्या राशीपासून लग्नभावात भ्रमण करत आहेत. त्यामुळे या काळात तुम्ही अधिक लोकप्रिय व्हाल. तुम्हाला मान-सन्मान मिळू शकतो. अविवाहित मीन राशीचे लोक एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकतात. या काळात प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील आणि अविवाहित लोक नातेसंबंधात जाऊ शकतात. तसेच भागीदारीत केलेल्या कामात तुम्हाला यश मिळू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)