Three Bad Habits Wealth: भारतीय इतिहासातील महान अर्थशास्त्रज्ञ व दूरदर्शी तज्ज्ञ आचार्य चाणक्य यांनी केवळ राजकारण आणि राज्यव्यवस्थेतच नव्हे, तर सामान्य माणसाच्या आर्थिक जीवनासाठीही अमूल्य मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या ‘नीति शास्त्र’मध्ये अनेक अशा गुणांचा उल्लेख आहे, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचं जीवन संपन्न व समृद्ध बनतं, तर काही वाईट सवयी जीवनभर धनसंपत्ती आणि समृद्धीपासून स्वत:ला दूर ठेवतात.
चाणक्य म्हणतात की, जगात असे काही लोक असतात की, त्यांनी कितीही मेहनत करू द्यावी, आर्थिकदृष्ट्या त्यांची कधीही उन्नती होत नाही. त्यामागे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या जीवनशैलीतील काही वाईट सवयी. चला तर पाहूया, देवी लक्ष्मीचा ज्यांना कधीच आशीर्वाद लाभत नाही असे तीन प्रकारचे लोक :
१. इतरांवर अवलंबून राहणारे लोक
चाणक्य सांगतात की, जे लोक आपले काम स्वतः करण्याऐवजी दुसऱ्यांवर सोडतात किंवा आत्मनिर्भर होत नाहीत, त्यांचे आर्थिक जीवन नेहमी संघर्षात अडकलेले असते. असे लोक कधीही कुठल्या कार्यात प्रावीण्य मिळवू शकत नाहीत आणि समाजात किंवा कामाच्या ठिकाणी उपयुक्त ठरत नाहीत.
२. कटू आणि कठोर वाणी असणारे लोक
चाणक्य म्हणतात की, कठोर किंवा कटू वाणी माणसाच्या भाग्याला कमजोर करते. अशा लोकांपासून लोक दूर होऊ लागतात आणि त्यांची सामाजिक, तसेच आर्थिक प्रगती थांबते. त्याउलट वाणी मधुर ठेवणारे लोक नातेवाईक, मित्र आणि सहकारी यांच्याशी चांगले संबंध ठेवतात, ज्यामुळे त्यांचे जीवन सुख-समृद्धीने भरलेले राहते.
३. आळशी लोक
चाणक्य म्हणतात की, आळस हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. आजचे काम उद्या करण्याची सवय असलेले लोक कधीही प्रगती करू शकत नाहीत. आळशीपणामुळे व्यक्तीची क्षमता, वेळ आणि संसाधने नष्ट होतात. परिणामी, अशा लोकांना जीवनभर सुख आणि आर्थिक समृद्धीची कमतरता भासते.
चाणक्यांच्या शिकवणीनुसार, स्वावलंबी होणे, सौम्य वाणी ठेवणे व आळसाला दूर ठेवणे हे तीन मुख्य मंत्र आहेत, जे जीवनात समृद्धी आणि धन आणतात. जे लोक या तीन मंत्रांचे पालन करतात, त्यांचे जीवन आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या समृद्ध बनते, तर जे त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांचे जीवन सतत संघर्षमय आणि आर्थिक कमतरतेत जात राहते.
तेव्हा लक्षात ठेवा की, घरात लक्ष्मी देवीचा प्रवेश व्हावा यासाठी हे नियम पाळणे अत्यावश्यक आहे. जीवनभर धनासाठी झटणाऱ्या, पण या तीन नकारात्मक सवयींचा त्याग न करणाऱ्या लोकांना कधीही संपन्नता लाभत नाही.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.)
