वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करून शुभ दृष्टी तयार करत असतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता ६ एप्रिल रोजी शुक्र ग्रहाने स्वतःच्या राशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश केला असून २ मे पर्यंत तो तिथेच विराजमान राहील. त्याच वेळी शुक्र आणि गुरु एकमेकांपासून तिसऱ्या आणि अकराव्या स्थानी राहतील. तर शनि आणि शुक्र चौथ्या आणि दहाव्या स्थानी असतील. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे. परंतु ४ अशा राशी आहेत, ज्यांच्यासाठी हा काळ लाभ आणि प्रगती ठरण्याची शक्यता आहे. त्या ४ राशी कोणत्या ते जाणून घेऊया

मेष राशी –

गुरु, शुक्र आणि शनिदेव यांची युती मेष राशीच्या लोकांसाठी चांगला सिद्ध होऊ शकतो. कारण या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. तर तुमच्या मनातील काही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला महत्वाच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रगतीदेखील होऊ शकते.

हेही वाचा- लक्ष्मी कृपेने २७ एप्रिलपासून ‘या’ राशींना चहुबाजूने मिळणार धन? गुरु उदय होताच श्रीमंती चालून दारी येऊ शकते

सिंह राशी –

गुरु, शुक्र आणि शनिदेव यांचे शुभ संबंध सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात तुम्हाला नोकरीत यश मिळण्याची शक्यता आहे. तर जे लोक व्यावसायिक आहेत त्यांना फायदा होऊ शकतो. नोकरदारांच्या करिअरमध्ये वाढ होऊ शकते. तर या काळात पैशाशी संबंधित चिंता दूर होण्यासह प्रेम संबंध चांगले राहण्याची दाट शक्यता आहे.

वृश्चिक राशी –

गुरु, शुक्र आणि शनिदेव यांची युती वृश्चिक राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला तुमचे नशीब साथ देऊ शकते. तसेच, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ चांगला ठरु शकतो. वैवाहिक सुखात वाढ होऊ शकते आणि कामात येणाऱ्या अनेक अडचणी दूर होऊ शकतात. करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तर जे बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात.

कुंभ राशी –

हेही वाचा- १० वर्षांनी ‘महाधन योग’ बनल्याने ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? शुक्राच्या कृपेने मिळू शकतो प्रचंड पैसा

कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरु, शुक्र आणि शनिदेव यांचा शुभ दृष्टी संबंध शुभ सिद्ध होऊ शकतात. या काळात तुमचे नशीब तुम्हाला साथ देण्याची शक्यता आहे. यासोबतच तुम्हाला नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा होऊ शकते. तर या काळात तुम्हाला भौतिक सुखही मिळू शकतात. प्रॉपर्टी संबंधित महत्वाचे निर्णय घेण्यासाठी ही वेळ चांगली ठरु शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)