1. मेष:-कौटुंबिक सौख्य चांगले राहील. बोलण्यातून इतरांवर छाप पडाल. गायन कलेला चांगला दर्जा मिळेल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधावा.
  2. वृषभ:-वैवाहिक सौख्यात भर पडेल. जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पाहाल. तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षकता येईल. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल. नटण्या मुरडण्याची हौस भागवाल.
  3. मिथुन:-जवळचा प्रवास करावा लागेल. भावंडांची उत्तम साथ लाभेल. सहकुटुंब दिवस मजेत घालवाल. सरकारी कामात वेळ जाईल. वाचनाची आवड पूर्ण कराल.
  4. कर्क:-स्त्रियांशी मैत्री वाढेल. नवीन गोष्टींचे आकर्षण वाढेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. मनातील रुक्षपणा काढून टाकावा.
  5. सिंह:-इतरांवर तुमची छाप पडेल. चंचलतेवर मात करावी. व्यापारी वर्गाला फायदा संभवतो. जोडीदाराची व्यवहारकुशलता दिसून येईल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल.
  6. कन्या:-आवडते ग्रंथ गोळा कराल. धार्मिक कामात सहकार्य कराल. आधिभौतिक गोष्टींकडे कल राहील. शैक्षणिक कामे पूर्ण होतील. काही नवीन अनुभव गाठीशी बांधाल.
  7. तूळ:-रेस सट्टा यांतून धनलाभ संभवतो. नातेवाईकांची मदत घेता येईल. कामे वेगात पूर्ण करता येतील. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे. फसवणुकीपासून सावध राहा.
  8. वृश्चिक:-गैरसमजुतीतून मानसिक त्रास वाढू शकतो. गरज असेल तरच प्रवास करा. व्यवसाय वृद्धीचा विचार करा. भावंडांचे प्रश्न समोर येतील. हातून एखादे सत्कार्य घडेल.
  9. धनू:-मनाची संवेदना दाखवाल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. आध्यात्मिक प्रगती करता येईल. कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. जुन्या कामातून फायदा संभवतो.
  10. मकर:-काही गोष्टी अनपेक्षित घडू शकतात. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. आर्थिक व्यवहारात सतर्कता दाखवावी. उधार उसनवारीचे व्यवहार टाळावेत. उगाचच चीड-चीड करू नये.
  11. कुंभ:-मनातील निराशा बाजूस सारावी. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. अती भावनाशील होऊ नका. ध्यानधारणेत वेळ घालवाल. डोळ्यांची काळजी घ्यावी.
  12. मीन:-कामात उगाचच अडकून पडल्यासारखे वाटेल. लबाड लोकांपासून दूर राहा. अती काळजी करू नका. सार्वजनिक कामात मदत कराल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

loksatta satire article on arvind kejriwal mango eating controversy
उलटा चष्मा : पुन्हा आंबापुराण
21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
7th April Panchang Masik Shivratri Mesh To Meen Daily Horoscope
७ एप्रिल पंचांग: एप्रिलची शिवरात्री मेष ते मीन राशींपैकी कुणाला देईल भोलेनाथांची कृपा; तुमच्या कुंडलीत काय लिहिलंय?
4th April Panchang Rashi Bhavishya Guruvaar
४ एप्रिल राशी भविष्य: गुरुवारी श्रवण नक्षत्रात मेष ते मीन पैकी कुणाचे नशीब चमकणार? धन, आरोग्य कसे असेल?