- मेष : घरी पाहुणे येण्याची शक्यता. शोभेच्या, मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. आपले निर्णय योग्य ठरतील. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल.
- वृषभ : आपल्याला महत्वाची कागदपत्रे मिळतील. आपल्या निर्णयांवर ठाम राहा. छोटे प्रवास करावे लागतील. दैनंदिन जीवनात बदल करण्यासाठी आपण उत्सुक असाल. नावीण्यपूर्ण कलाकृती मन मोहून घेतील.
- मिथुन : आर्थिक उलाढालींच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल. शोभेच्या मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. सामाजिक कार्यात आपल्या बोलण्याचा प्रभाव पडेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक फायदा करुन देईल.
- कर्क : मानसिक स्वास्थ सुधारेल. महत्वाची कामे मार्गी लागतील. आपले निर्णय योग्य ठरतील. तीव्र इच्छाशक्ती व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणे मात कराल.
- सिंह : भावंडांच्या परदेशगमन योगासाठी आजचा दिवस अनुकूल. नोकरी-व्यवसायाव्यतिरिक्त आर्थिक आवक होण्याच्या दिवस कौटुंबिक कलह टाळावेत. जुन्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. एखाद्या सेवाभावी संस्थेतून किंवा सहकारी संस्थातून काम करता येईल.
- कन्या : आज नोकरीच्या ठिकाणी आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. आपल्याला महत्व प्राप्त होईल. जबाबदारीची कामे आपल्यावर सोपवली जातील. अनपेक्षित धनप्राप्तीचे योग. सासूरवाडीकडून आर्थिक लाभ घडून येतील. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका.
- तूळ : ठरविलेली कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. आपली कौटुंबिक कर्तव्ये पार पाडाल. आज आपण आकर्षक खरेदी कराल. समोरच्या व्यक्तीची बाजू ऐकूण घेवूनच त्यावर आपले मत व्यक्त करा. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील.
- वृश्चिक : खरेदीसाठी अनुकूल दिवस. आज आपल्या जोडीदाराबरोबर सहलीचे बेत आखाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल दिवस. व्यवसायात जवळच्या नातेवाईकांना सहभागी करून घेणे शक्य असेल तर जरूर करा. नव्या कामाचा प्रस्ताव येईल.
- धनु : संतसज्जनांचा आज आपल्याला सहवास लाभेल. आजचा दिवस आपल्यासाठी व्यवासायिक कार्यक्षेत्र वाढण्याच्यादृष्टीने अनुकूल. आज आपल्या आप्तस्वकियांशी गाठीभेटी होतील. महिलांची विवाहकार्यातील मध्यस्थी योग्य व निर्णायक ठरेल. संततीसंबंधी चिंता दूर होतील.
- मकर : वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल. तरुणांना आपला जोडीदार निवडता येईल. मामा-मावशीच्या गाठी भेटी घडतील. महिला स्वतःच्या पद्धतीने गृहसजावट करतील. महिलांना बदलाची नितांत गरज भासेल.
- कुंभ : विरोधकांशी मत्तभेद टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. संसर्गजन्य विकार उद्भवण्याची शक्यता. पत्रव्यवहार करताना सावधगिरी बाळगा. घरात वैचारिक मतभेद होण्याची शक्यता. त्यामळे मनावर तणाव राहील.
- मीन : शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल. नोकरीसाठी मुलाखतीला आज आपण जाणार असाल, तर नक्की यशस्वी व्हाल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. गृहसुशोभिकरणासाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल.
— ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2020 रोजी प्रकाशित
आजचं राशीभविष्य, गुरुवार, ३१ डिसेंबर २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 31-12-2020 at 09:34 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily astrology horoscope thursday 31 december 2020 aau