Horoscope Today, 18 April 2025 : १८ एप्रिल २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी संध्याकाळी ५ वाजून ०८ मिनिटांपर्यंत राहील. ज्येष्ठा नक्षत्र ८ वाजून २१ मिनिटांपर्यंत जागृत असेल. परिघ योग १ वाजून ०३ मिनिटांपर्यंत जुळून येईल. आज राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. तर आज लक्ष्मीच्या कृपेने कोणाच्या आयुष्यात सुख-समृद्धी येणार हे आपण जाणून घेऊया…
१८ एप्रिल पंचांग व राशिभविष्य (Today’s Horoscope In Marathi) :
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)
मनाची चंचलता जाणवेल. कुठल्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. सर्व कामे तत्परतेने कराल. योग्य तर्क लावता येईल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)
फार विचार करू नये. चोरांपासून सावध रहा. अनाठायी खर्च होऊ शकतो. आवडी निवडी वर अधिक भर द्याल. झोपेची तक्रार जाणवेल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)
मनावर कुठल्या तरी गोष्टीचा ताण राहील. तब्येतीची वेळेवर तपासणी करून घ्यावी. लहानांच्यात लहान होऊन रमाल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)
भावनेला आवर घालावी लागेल. पत्नीचे प्रभुत्व राहील. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे. कामात मित्रांचे सहकार्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)
चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. स्नायू धरणे यांसारखे त्रास संभवतात. वडीलधार्यांचा योग्य तो मान राखाल. प्रवासाची आवड पूर्ण होईल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)
भावंडांची काळजी लागून राहील. कामात एकसूत्रता ठेवावी. घरगुती कामांचा बोझा उचलाल. मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. जोडीदाराबाबत गैरसमज करू नयेत.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)
घरात काही बदल करावे लागतील. स्थावरची कामे पुढे सरकतील. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. भागीदारीतील लाभ उठवाल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)
तुमच्या कामाचा जोम वाढेल. धाडस करताना सारासार विचार करावा. कमी वेळात कामे पूर्ण करण्यावर भर द्याल. मनातील अकारण भीती बाजूस सारावी. भावंडांना मदत करावी लागेल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)
हातातील कामात यश येईल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे लागेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. वादविवादात भाग घेऊ नका. कोर्ट कचेरीची कामे निघतील.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)
नातेवाईकांशी मतभेद संभवतात. कामातील क्षुल्लक अडचणी दूर कराव्यात. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. उत्साहाने कामे हाती घ्याल. उगाच चिडचिड करू नका.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)
कामानिमित्त प्रवास करावा लागेल. तुमच्यावर नवीन कामांचा भार पडेल. धैर्य व चिकाटी सोडू नका. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. इतरांना तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)
घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून वागाल. कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पूर्ण कराल. हातातील कलेसाठी वेळ द्याल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर