Aajche Rashi Bhavishya In Marathi 25 October 2025 : आज २६ ऑक्टोबर २०२५ रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असणार आहे. आज शोभन योग जुळून येईल आणि ज्येष्ठ नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ४ वाजून ११ मिनिटांनी सुरु होईल ते ५ वाजून ३४ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ३९ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २३ मिनिटांपर्यंत असणार आहे. रविवार तुमच्या राशीचा हसत-खेळत जाणार की दुःखात जाणून घेऊया…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, २६ ऑक्टोबर २०२५ (Rashi Bhavishya 26 October 2025 )
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)
आवडी-निवडीसाठी खर्च कराल. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केन्द्रित करावे.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)
आपले मानसिक आरोग्य जपावे. अति विचार करू नयेत. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. व्यापारात काही नवीन सुविधा कराल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)
आपणहून कोणत्याही गोष्टीत अडकू नका. आपल्या कामात हुशारी दाखवावी. दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील. काही चांगले बदल अनुभवास येतील. मन प्रसन्न राहील.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)
जुने आजार दुर्लक्षित करू नका. वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे. दिवसभर आत्ममग्न राहाल. टीकेकडे फार लक्ष देऊ नये. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)
स्वत:वरुन इतरांची परीक्षा करा. अपेक्षित उत्तराची वाट पहाल. संमिश्र घटनांचा दिवस. छुप्या शत्रूपासून सावध राहावे. अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)
आवश्यक तिथे आक्रमक पवित्रा घ्यावा. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा. जोडीदाराचे सहकार्य घ्याल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)
घरात सामंजस्याने वागावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. डोकेदुखीचा त्रास संभवतो. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)
भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील. रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील. काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ द्या.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)
आहाराचे पथ्य न चुकता पाळा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)
नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल. भावंडांशी मतभेद संभावतात. सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल. प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका. काही गोष्टीत समाधान मानावे लागेल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)
काही गोष्टींचे चिंतन करावे. जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. बोलतांना सारासार विचार करावा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे. जुगारातून लाभ संभवतो.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)
अति घाई करू नये. जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा. कामात गोंधळ उडवून घेऊ नका. घरातील वातावरण खेळकर राहील. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
