scorecardresearch

Premium

Daily Rashi Bhavishya : ‘या’ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार, पाहा तुमचे भविष्य

Horoscope Today in Marathi : राशीभविष्यानुसार धनू राशीच्या व्यक्तींना चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता.

Today Horoscope in marathi
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२३ (Photo : Freepik)

Daily Rashibhavishya in Marathi, 28 November  2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

शारीरिक दृष्टया सक्षम राहाल. आजचा दिवस व्यस्त असेल. जवळचा प्रवास घडेल. उत्साहाने व जोमाने कामे तडीस न्याल. आर्थिक प्रश्न सुटेल.

Libra Yearly Horoscope 2024
Libra Yearly Horoscope 2024: तूळ राशीला लक्ष्मी कधी देणार प्रचंड धनलाभ? जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य
Shukra Gochar 2024
उद्यापासून ‘या’ ३ राशींचे अच्छे दिन? शुक्रदेवाच्या नक्षत्र परिवर्तनाने श्रीमंत होण्याची संधी येऊ शकते दारी
qualify as marriage
दीर्घकाळ एकत्र राहण्यास लग्नाचा दर्जा मिळत नाही…
can your routine blood tests indicate a risk of heart attack but how to read your blood reports correctly and take corrective measures
नियमित रक्ताच्या चाचण्यांमुळे हृदयविकारचा धोका लक्षात येतो का? चाचण्यांचे रिपोर्ट समजून घ्यायचे कसे? डॉक्टर म्हणाले…

वृषभ:-

शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना दिवस लाभदायक असेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. थोरांचे आशीर्वाद घेता येतील. उत्कृष्ट कल्पनाशक्ती लाभेल.

मिथुन:-

कोणतीही चर्चा जास्त वेळ ताणू नका. अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकता. आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्यावे. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे.

कर्क:-

जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. संयमी भूमिका घ्यावी लागेल. नवीन योजनांवर अंमल करू शकाल. अचानक मूड बदलू शकेल. छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होऊ नका.

सिंह:-

नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. सहकार्‍यांशी संयमी भूमिकेतून वागावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. विरोधकांकडे विशेष लक्ष द्यावे. गुप्त शत्रूंकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या:-

पूर्वी शिकलेल्या गोष्टीतून लाभ मिळू शकेल. तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन मिळेल. मनातील प्रेमभावना व्यक्त करता येईल. नवीन पुस्तक खरेदी करू शकता. नवीन गोष्टीत रस घ्याल.

तूळ:-

कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. घरातील थोरांच्या मतांचा आदर करावा. आपले विचार प्रभावीपणे मांडावेत. घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. मनातील चिंता दूर होतील.

वृश्चिक:-

पराक्रमात वाढ होईल. आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. सहकार्‍यांशी असणारे संबंध सुधारतील. भावंडांना मदत कराल. अति उत्साहात नसते उद्योग करू नका.

धनू:-

कौटुंबिक कामात सक्रिय सहभाग घ्याल. घाईने कोणतेही काम करायला जाऊ नका. दिवस आनंदात जाईल. बोलण्यात माधुर्य राखाल. चांगला आर्थिक लाभ संभवतो.

मकर:-

कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. नवीन विचारांना चालना द्यावी. जोडीदारासोबत मन मोकळ्या गप्पा होतील. जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. भविष्याची चिंता करत बसू नका.

कुंभ:-

काही खर्च अचानक सामोरे येतील. आपल्या मतावर ठाम राहावे. आध्यात्मिक कार्यात सहभाग घ्याल. कोर्ट कचेरीची कामे वेळ घेतील. मानसिक व्यग्रता टाळण्याचा प्रयत्न करावा.

मीन:-

कौशल्याने वागाल. व्यापार्‍यांना उत्पन्नात वाढ होईल. नवीन खरेदी करता येईल. जुने सहकारी भेटतील. मोठ्या भावंडांची मदत होईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Daily horoscope 28 november daily astrology rashi bhavishya in marathi jap

First published on: 27-11-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×