- मेष:-
मानसिक चंचलता जाणवेल. ध्यानधारणा करून पहावी. कामानिमित्त बाहेर गावी जाण्याचा योग येईल. प्रवास चांगला होईल. आध्यात्मिक बळ वाढेल. - वृषभ:-
जवळचे मित्र भेटतील. कामात स्त्री वर्गाचा हातभार लागेल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होईल. स्वकष्टाने आकांक्षा पूर्ण कराल. मोठ्या लोकांच्या ओळखी वाढतील. - मिथुन:-
उत्तम व्यावसायिक लाभ होईल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीला चांगला पर्याय मिळेल. कामातून इच्छित धनलाभ होईल. दिवस धावपळीत जाईल. - कर्क:-
वडीलधाऱ्यांचा योग्य तो मान ठेवाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. धार्मिक कामात मदत कराल. हातातील कामात यश येईल. तुमच्यातील सज्जनपणा दिसून येईल. - सिंह:-
मनाची दोलायमान अवस्था होईल. आपल्या निर्णयावर ठाम राहावे. फार विचार करत बसू नये. कफाचे विकार संभवतात. अचानक धनलाभ संभवतो. - कन्या:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कामात स्त्रियांची मदत घ्याल. भागीदारीत दिवस चांगला जाईल. तुमचा संपर्क वाढेल. रागावर नियंत्रण ठेवावे. - तूळ:-
गप्पांमध्ये वेळ घालवाल. कामाची दगदग जाणवेल. कौटुंबिक गोष्टींचा विचार कराल. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. श्रमामुळे थकवा जाणवेल. - वृश्चिक:-
चैनीच्या वस्तू खरेदी कराल. झोपेची तक्रार जाणवेल. सामुदायिक गोष्टींचे भान राखावे. काही कामे अडकून पडतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. - धनु:-
क्षणिक गोष्टींचा आनंद घ्याल. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. प्रगल्भ विचार मांडाल. मोठ्या लोकांची ओळख होईल. कामातील बदल स्वीकारा. - मकर:-
उत्तम मानसिक शांतता मिळेल. सरकारी कामात अधिक लक्ष घालावे. तीर्थ यात्रेचे योग येतील. ऐशारामाच्या वस्तू खरेदी कराल. व्यावसायिक उत्पन्न वाढेल. - कुंभ:-
आवड-निवड दर्शवाल. नवीन मित्र जोडावेत. कामातून समाधान मिळेल. मनाजोगी खरेदी करता येईल. अपेक्षा पूर्तीची इच्छा बाळगाल. - मीन:-
मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. दिवस आनंदात जाईल. तुमच्या ज्ञानाचा सदुपयोग होईल. आरोग्यात सुधारणा होईल. छंद जोपासायला वेळ मिळेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 8th Nov 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०८ नोव्हेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 08-11-2019 at 00:07 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 08 november 2019 aau