- मेष:-
कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. औद्योगिक वातावरण चांगले राहील. व्यवसाईक ठिकाणी मने जिंकून घ्याल. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. सांपत्तिक स्थिती सुधारेल. - वृषभ:-
तुमची सहृदयता दिसून येईल. चांगले साहित्य वाचाल. लेखकांना चांगली प्रतिभा लाभेल. विशाल दृष्टिकोन ठेवाल. कलेला उत्कृष्ट वातावरण लाभेल. - मिथुन:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कमी श्रमात कामे होतील. रेस, जुगार यांतून धनलाभ संभवतो. सासुरवाडीची मदत मिळेल. मुलांशी मतभेद संभवतात. - कर्क:-
दिवस आनंदात जाईल. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप होईल. घरगुती कामे वाढतील. ज्येष्ठांची काळजी घ्यावी. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका. - सिंह:-
तर्कनिष्ठ बुद्धी वापराल. कामात विशेष प्राविण्य मिळवाल. कामाची योग्य पावती मिळेल. वाहन जपून चालवावे. मानसिक तोल सांभाळावा. - कन्या:-
मनात येईल तसा खर्च कराल. वादविवादात पडू नये. तिखट पदार्थ खाण्याची हौस भागवाल. लहरीपणाने वागू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. - तूळ:-
दिवसभर कामाची गडबड असेल. कर्तुत्वाला वेग येईल. स्वबळावर काम करण्याकडे कल राहील. थोडा हट्टीपणा कमी करावा. सर्व गोष्टींचा समतोल राखणे शक्य होईल. - वृश्चिक:-
सामुदायिक वादात लक्ष घालू नका. क्षुल्लक अडचणींवर मात करावी. दिवसभर धावपळ करावी लागेल. काही कामे विनासायास अडकून पडतील. व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित करावे. - धनु:-
प्रॉपर्टीच्या कामातून आर्थिक लाभ संभवतो. झोपेची तक्रार जाणवेल. लबाड लोकांपासून दूर राहावे. मौल्यवान वस्तू संभाळाव्यात. शांतपणे विचार करावा. - मकर:-
काही बदल अचानक दिसून येतील. वैवाहिक सौख्यात भर पडेल. यात्रेचे योग येतील. गप्पीष्ट लोकांच्या समुहात वावराल. लहानात लहान होऊन खेळाल. - कुंभ:-
वरिष्ठांना नाराज करु नका. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी. कामाचे सखोल ज्ञान घ्यावे. उपासनेकडे अधिक लक्ष द्यावे. वाहन चालवतांना सतर्क राहावे. - मीन:-
कामात घरातील स्त्रियांचा हातभार लागेल. मनातील इच्छेला मूर्त रुप द्यावे. नवीन मित्र जोडाल. उष्णतेचे विकार जाणवतील. पत्नीचा हट्ट पुरवाल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, सोमवार, १६ डिसेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 16-12-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 16 december 2019 aau