मेष
मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. व्यवहार जपून करणे. प्रकृतीची काळजी घ्यावी. वादविवाद टाळावेत. महादेव मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करणे.
आजचा रंग – नारंगी
वृषभ
मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. सर्व प्रकारचे लाभ मिळतील. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू ठेवणे.
आजचा रंग – आकाशी
मिथुन
मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. अधिकारी, व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे. नवीन कामांसाठी उत्तम प्रतिसादाचा दिवस आहे. महादेवाच्या मंदिरात धान्य आणि पांढरी फुले अर्पण करावी.
आजचा रंग – पांढरा
कर्क
मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. प्रवास संभवतात. वाहने जपून चालवावीत. कामांचा तणाव जाणवेल. आर्थिक लाभ होतील. ओम नमः शिवाय जप करावा.
आजचा रंग – गडद पिवळा
सिंह
मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. प्रवास जपून करावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. ओम नमः शिवाय जप करावा.
आजचा रंग – नारंगी
कन्या
मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. व्यवसायात प्रगती कराल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. महादेवाच्या मंदिरात अभिषेक करणे.
आजचा रंग- नेव्ही ब्लू
तुळ
मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाली जपून करावी. ओम नमः शिवाय जप दिवसभर मनातल्या मनात सुरू ठेवावा.
आजचा रंग – नारंगी
वृश्चिक
मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. व्यावसायिकांसाठी चांगला दिवस, उत्तम प्रतिसादाचा दिवस आहे. आज संतती सौख्य लाभेल. ओम सोमाय नमः जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पोपटी
धनु
मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. आनंदी दिवस जाईल. ओम नमः शिवाय जप करणे.
आजचा रंग – नारंगी
मकर
मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज भावंडाच्या गाठीभेटीचे योग आहेत. प्रवासाचे योग आहेत. कुलदैवतेचे स्मरण करुन दर्शन घ्यावे. आजचा रंग – आकाशी
कुंभ
मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक निर्णयासाठी दिवस चांगला आहे. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा. ओम नमः शिवाय जप करणे.
आजचा रंग – राखाडी
मीन
मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज महत्त्वांच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी, गाठीभेटीचे योग. आज महत्त्वाचे निर्णय घेताना, वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. संध्याकाळी महादेवाचे दर्शन घेणे, पशुपक्षांना अन्नदान करणे.
आजचा रंग – तपकिरी
– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu