- मेष:-
बैठे खेळ खेळाल. बौद्धिक छंद जोपासाल. वैचारिक मतभेद घडून येतील. मनाचा गोंधळ उडेल. कल्पनाशक्तीला चांगला वाव द्यावा. - वृषभ:-
कौटुंबिक विचारात अडकून राहाल. सर्वांशी गोडीने वागाल. गायन कला जोपासता येईल. घरगुती जबाबदारी उचलाल. खाण्या-पिण्याची आवड दर्शवाल. - मिथुन:-
ठामपणा ठेवायला हवा. मनाची चंचलता वाढवू नका. मित्रांशी वादाचे प्रसंग येवू शकतात. प्रेमसंबंध जपावेत. पित्तविकार त्रासदायक ठरतील. - कर्क:-
सामाजिक जाणिवेतून काही गोष्टी कराव्यात. स्त्रीवर्गापासून दूर राहावे. सामाजिक वादात लक्ष घालू नका. क्षुल्लक कारणाने काही कामे अडकतील. काचेरीची कामे पुढे ढकलावीत. - सिंह:-
घेतलेल्या परिश्रमाचे चीज होईल. अपेक्षित लाभासाठी पुरेसा वेळ दयावा. कामात स्त्रियांची मदत घ्याल. इच्छित गोष्ट मिळविण्याची जिद्द मनात बाळगाल.जवळचा मित्र भेटेल. - कन्या:-
वडिलांची उत्तम साथ मिळेल. तुमचा मोठेपणा इतरांच्या लक्षात येईल. सामाजिक प्रतिष्ठेकडे लक्ष द्याल. आपली पत जपावी लागेल. कामात सुसंगती ठेवावी. - तूळ:-
तुमची सृजनशीलता दिसून येईल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. कामावर श्रध्दा ठेवावी. स्वतःचा मान राखण्याचा प्रयत्न कराल. उपासनेचा आधार घ्यावा लागेल. - वृश्चिक:-
मानसिक शांतता महत्वाची आहे. विचारात वाहून जाऊ नका. कमी श्रमात मिळणाऱ्या गोष्टींचा आधार घेऊ नये. गुरुजनांवर विश्वास ठेवावा. निराशा मनातून काढून टाकावी. - धनु:-
पत्नीचा लाघवीपणा मनात भरेल. मनातून शंका दूर करावी. भागीदारीकडे विशेष लक्ष द्यावे. मानाजोगी खरेदी करता येईल. दिवस शांततेत जाईल. - मकर:-
हाताखालील लोकांकडे लक्ष द्यावे. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नये. चुकीचे समज होण्याची शक्यता आहे. व्यसनांपासून दूर राहावे. वादाचे प्रसंग आणू नका. - कुंभ:-
मुलांची चिंता लागून राहील. चटकन भावना प्रकट करू नका. काहीसा विसारभोळेपणा जाणवेल. कोणत्याही अनुमानावर येऊ नका. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. - मीन:-
घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. क्षुल्लक गैरसमज दूर करावेत. घरात नातेवाईक गोळा होतील. मैत्रीत मतवैचित्र दर्शवू नका. मन:शांती राखण्याचा प्रयत्न करावा.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, शनिवार, १४ डिसेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 14-12-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 14 december 2019 aau