मेष

मेष राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. महत्त्वाच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायांत प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल.  कुंटुबासमवेत वेळ घालवाल. रामरक्षेचे पाठ करावेत.
आजचा रंग- लाल

वृषभ

मेष राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक नियोजनांसाठी दिवस चांगला आहे. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील, उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. श्री भगवान कृष्णाचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – आकाशी

मिथुन

मेष राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. सर्व कामांचा पाठपुरावा करण्यासाठी उत्तम ग्रहमान. वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. दुर्गा कवच वाचावे.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

मेष राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. अधिकारी वर्गाची आणि वरिष्ठांची मर्जी प्राप्त करू शकाल. नवीन वाहनांचा योग, छोटे प्रवास घडू शकतात. नवीन संधी निर्माण होतील. त्याचा पाठपुरावा करावा. बढतीसाठी प्रयत्न करावेत. मुलांचे कौतुक होईल. शनी आणि मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

सिंह

मेष राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस. नवीन कामांसाठी, बढतीची कामे करण्यासाठी, भेटीगाठीसाठी उत्तम दिवस. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपती मंदिरात दानधर्म करावा.
आजचा रंग – हिरवा

कन्या

मेष राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल. ताणतणाव कमी होईल. उलाढाली जपून करावी. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. शनी मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.
आजचा रंग – पांढरा

तुळ

मेष राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. ताण कमी होईल. थोडी उसंत जाणवेल. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. कुटुंबाला वेळ देऊ शकाल. प्रवासाचे योग आहेत. शनी मंदिरात अन्नदान करावे. गुरुंचे स्मरण करुन इच्छा अपेक्षा मागाव्यात.
आजचा रंग- हिरवा

वृश्चिक

मेष राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस राहील. आर्थिक निर्णय सल्ला मसलत केल्याशिवाय घेऊ नये. स्त्रियांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेचे विकार होऊ देऊ नये. मारुती मंदिरात दिवा लावावा.
आजचा रंग – निळा

धनु

मेष राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. कामासाठी प्रवासाचे योग येतील. कदाचित परदेशी प्रवास करावा लागेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. गुरुजनांमध्ये आणि आप्तेष्टांमध्ये वेळ घालवावा. मारुती मंदिरात दिवा लावावा.
आजचा रंग – पांढरा

मकर

मेष राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. अधिकारी वर्गाची मर्जी प्राप्त करू शकाल. नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकेल. ती तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. कामाचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस आहे. मारुती मंदिरात मारुती स्त्रोत्राचा पाठ करावा.
आजचा रंग – लाल

कुंभ

मेष राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक निर्णयासाठी उत्तम दिवस आहे. महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी होतील. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. शनी मंदिरात दान धर्म करावे.
आजचा रंग – आकाशी

मीन

मेष राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. दत्त महाराजांना पांढरी फुले अर्पण करुन दर्शन करावे.
आजचा रंग – राखाडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu