- मेष:-
सांपत्तिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. सर्वांचे उत्तम आगत-स्वागत कराल. मनाजोगी खरेदी कराल. गोड पदार्थांवर ताव माराल. - वृषभ:-
प्रराक्रमाला चांगली संधी मिळेल. स्वकष्टावर भर द्याल. नवीन उलाढाली कराल. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. महत्वकांक्षा वाढीस लागेल. - मिथुन:-
चोरांपासून सावध राहावे. जमीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी. सामाजिक कामात मदत कराल. प्रवासात सावधगिरी बाळगावी. मानसिक शांतता जपावी. - कर्क:-
उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मित्र-मंडळींचा गोतावळा जमवाल. आर्थिक चिंता मिटेल. गृहशांती जपावी. - सिंह:-
व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. कामात धरसोडपणा करू नका. काही गोष्टींना पुरेसा वेळ द्या. संयम ढळू देऊ नका. मानापमान बाजूला सारावा. - कन्या:-
आर्थिक कोंडी मिटेल. इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. अडचण दूर होईल. मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल. परोपकाराची जाणीव ठेवाल. - तूळ:-
वडिलांची नाराजी दूर करावी. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. काही कामे संथगतीने होतील. लाॅटरीमधून धन लाभ संभवतो. गायन कलेचे कौतुक केले जाईल. - वृश्र्चिक:-
जोडीदाराचा सुशिक्षितपणा दिसून येईल. वैवाहिक सौख्याचा आनंद वाढेल. भागीदारीत फायदा संभवतो. धार्मिक गोष्टींची आवड जोपासाल. तुमचा संपर्क वाढला जाईल. - धनू:-
वैवाहिक सौख्याकडे विशेष लक्ष द्यावे. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. कामातून विरंगुळा शोधाल. दिवस समाधानात जाईल. - मकर:-
ओळखीतून जिव्हाळा वाढेल. छानछोकीची आवड जोपासाल. नाटक, सिनेमा बघायला जाल. प्रेम संबंध सुधारतील. मैत्री अधिक घट्ट होईल. - कुंभ:-
घरातील कामांना वेगळा वेळ काढाल. कौटुंबिक वातावरण चांगले असेल. बागकामाची आवड पूर्ण कराल. नातेवाईकांनी घर भरुन जाईल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल. - मीन:-
वाचनाची आवड पूर्ण होईल. लहान प्रवास होईल. हातून सत्कार्य घडेल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. बौध्दिक क्षमतेचा वापर करता येईल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 14th Nov 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, गुरुवार, १४ नोव्हेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 14-11-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 14 november 2019 aau