- मेष:-
हाताखालील कामगारांचे सहकार्य मिळेल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. क्षुल्लक गोष्टींवरून वाद वाढू शकतो. संयम बाळगावा लागेल. समजुतीने धोरण ठेवावे लागेल. - वृषभ:-
कौटुंबिक सौख्य बहरेल. घरातील कामात रमून जाल. छुप्या शत्रूंचा त्रास संभवतो. विरोधाचा सामना करावा लागेल. पोटाची काळजी घ्यावी. - मिथुन:-
कौटुंबिक कामानिमित्त प्रवास कराल. भावंडांची मदत मिळेल. मानसिक स्थैर्य लाभेल. मुलांच्या कारवाया वाढतील. क्षुल्लक कारणांनी चिडचिड वाढेल. - कर्क:-
कौटुंबिक गोष्टीत गुंतून पडाल. घरगुती कटकट वाढू शकते. शांततेत धोरण ठेवावे लागेल. भावनेच्या आहारी जाऊ नका. आवडीचे पदार्थ खाल. - सिंह:-
इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. मुलांशी कुरबुर होऊ शकते. दिवस मजेत घालवाल. कामात येणार खंड टाळावा. शैक्षणिक गोष्टी सुरळीत पार पडतील. - कन्या:-
मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा. उगाच नसती काळजी करत बसण्यात अर्थ नाही. घरगुती जबाबदारीकडे विशेष लक्ष द्यावे. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. संपर्कातून कामे पार पडतील. - तूळ:-
मनातील आकांक्षा पूर्ण होतील. आततायीपणा करून चालणार नाही. श्रम वाढतील. सारासार विचार करूनच कृती करावी. डोकेदुखी वाढू शकते. - वृश्चिक:-
गोड बोलून कामे साध्य होतील. अघळपघळ गप्पा होतील. आपले विचार व्यवस्थित मांडाल. कामाची योग्य खातरजमा करावी लागेल. अभ्यासू दृष्टिकोन ठेवावा. - धनु:-
कामाच्या योग्य जुळवणीला महत्व द्यावे. दिवस दगदगित जाईल. मनावर फार ताण घेऊ नये. वेगळ्या बाजूने विचार करून पहावा. कागदपत्रांची योग्य छाननी करावी. - मकर:-
सर्व गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक सौख्य वाढेल. विचारपूर्वक योग्य निर्णय घ्याल. खरेदीची हौस पूर्ण कराल. सर्वांशी मिळूनमिसळून वागाल. - कुंभ:-
गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. काही गोष्टी गुप्त ठेवाल. उत्तम व्यवसाईक लाभ होईल. घरात मोठ्या लोकांची उठबस वाढेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. - मीन:-
गैरसमजातून वाद वाढू शकतो. सर्वाना आनंदी ठेवाल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल. स्त्रियांशी मैत्री वाढेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, गुरुवार, १९ डिसेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 19-12-2019 at 00:17 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 19 december 2019 aau