• मेष:-
    जोडीदाराचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. क्षुल्लक कारणांवरून वाद वाढवू नका. काही व्यावसायिक अडचणी दूर कराव्या लागतील. कोर्टाची कामे पुढे ढकलावीत. भागीदाराशी मतभेद संभवतात.
  • वृषभ:-
    किरकोळ जखमा होण्याची शक्यता आहे. मानसिक चिंता वाढवू नका. जिद्दीने कामे कराल. गैरसमजुतीने त्रास वाढू शकतात. कष्ट अधिक वाढू शकतात.
  • मिथुन:-
    जवळचा प्रवास सुखकर होईल. स्थावरच्या कामात काही अडचण येऊ शकते. जोडदाराची प्रगती होईल. काही कामे विनासायास पार पडतील. अचानक धनलाभ संभवतो.
  • कर्क:-
    जोडीदाराचा प्रेमळ सहवास वाढेल. भागीदारीत चांगला नफा मिळवाल. दिवस आनंदात जाईल. आरोग्यात सुधारणा होईल. वैवाहिक सौख्यात भर पडेल.
  • सिंह:-
    तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. मानाजोगी कामे पार पडतील. जवळचा प्रवास जपून करावा. जवळचे मित्र भेटतील. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
  • कन्या:-
    प्रवासात फार घाई करू नये. घरातील गोष्टी सबुरीने घ्याव्यात. लोकांशी संपर्क वाढेल. बोलतांना तोंडात साखर ठेवावी. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.
  • तूळ:-
    अघळपघळ बोलणे होईल. घराची सजावट कराल. कर्तुत्वाला चालना मिळेल. भावंडांची जबाबदारी घ्याल. रागावर नियंत्रण ठेवावे.
  • वृश्चिक:-
    सामाजिक बांधिलकी जपावी. सामुदायिक वादात अडकू नये. संभाषणाची आवड जोपासाल. गप्पांमध्ये वेळ घालवाल. हस्तकलेचा आनंद घ्याल.
  • धनु:-
    काही कामे खिळून राहू शकतात. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मैत्रीत वितुष्ट आड आणू नये. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे. सतत खटपट करत राहाल.
  • मकर:-
    बदलांना स्वीकारावे लागेल. अंगीभूत कलेत मन रमवावे. आवडत्या गोष्टी कराव्यात. झोपेची तक्रार जाणवेल. आध्यात्मिक प्रगती करता येईल.
  • कुंभ:-
    लपविण्याकडे कल राहील. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात. व्यावसायिक लाभाकडे लक्ष राहील. कमिशन मध्ये फायदा होईल. अधिकाऱ्यांची भेट होईल.
  • मीन:-
    ऐशोरामाकडे कल राहील. आळस झटकून कामाला लागावे. जोडीदाराशी गैरसमज वाढू शकतात. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर