Dainik Horoscope Updates : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन आणि राशी परिवर्तनाच्या आधारावर १२ राशींच्या ग्रह स्थितीचा अभ्यास केला जातो. ग्रहांच्या ठरविक वेळेनंतर होणाऱ्या या बदलांमुळे अनेक शुभ-अशुभ योग निर्माण होतात, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. याव्यतिरिक्त अंकशास्त्राच्या आधारावरही व्यक्तीचे गुण, स्वभाव याबाबत माहिती दिली जाते. चाणक्य नीतिद्वारे देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते.

Live Updates

Rashi Bhavishya live in Marathi : आजचे राशिभविष्य लाईव्ह २० एप्रिल २०२५

17:26 (IST) 20 Apr 2025

सूर्य आणि मंगळ बनवणार केंद्र दृष्टि योग, 'या' पाच राशींचे पालटणार नशीब, मिळणार छप्परफाड पैसा, धन आणि संपत्ती

Kendra Drishti Yog 2025 : सूर्य आणि मंगळाचा हा मंगलकारी योग काही राशींसाठी लाभदायक ठरू शकतो. त्या राशी कोणत्या आहेत. हे आज आपण जाणून घेणार आहोत. ...अधिक वाचा
17:25 (IST) 20 Apr 2025

मीन आजचे राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)

स्वछंदीपणे विचार कराल. कामातील सर्व बाजू व्यवस्थितपणे समजून घ्याल. मानसिक व्यग्रता जाणवेल. जुगाराची आवड पूर्ण करता येईल. मुलांबरोबर खेळात रमून जाल.

17:25 (IST) 20 Apr 2025

कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)

कामाचे समाधान लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य घेता येईल. सहकार्‍यांची योग्य वेळी मदत होईल. आत्मविश्वास बाळगावा लागेल. उगाच चीड-चीड करू नये.

17:25 (IST) 20 Apr 2025

मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)

श्रम व दगदग वाढू शकते. पित्त विकार बळावू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका. जवळचे मित्र भेटतील. प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल.

17:24 (IST) 20 Apr 2025

धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathi)

अनाठायी खर्च वाढू शकतो. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. पत्नीचा प्रेमळ सहवास लाभेल. महिलांना गृहिणी पदाचा मान मिळेल. योग्य संधीसाठी थोडा वेळ द्या.

16:19 (IST) 20 Apr 2025

वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)

पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल.

14:57 (IST) 20 Apr 2025

तूळ आजचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)

अचानक धनलाभ संभवतो. कामात गतीमानता लाभेल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. घाई -घाईने कामे उरकू नका. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे.

13:59 (IST) 20 Apr 2025

कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)

मुलांचे विचार दुराग्रही वाटू शकतात. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. धार्मिक कामात सहभाग घ्याल. कल्पना शक्तीला चांगला वाव मिळेल. विशाल दृष्टिकोन ठेवाल.

13:16 (IST) 20 Apr 2025

शनी करणार मालामाल! २७ वर्षांनी शनिदेव स्वनक्षत्रात येताच ८ दिवसांनी 'या' राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय? मिळेल प्रेम आणि प्रसिद्धी

Shani Dev Nakshatra Parivartan: शनिदेवाचे नक्षत्र परिवर्तन होताच काही राशींचे चांगले दिवस येऊ शकतात. ...सविस्तर बातमी
12:33 (IST) 20 Apr 2025

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)

मानसिक चंचलता जाणवेल. भावनेच्या आहारी जाऊ नका. अंगीभूत कला सर्वांसमोर सादर कराल. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. उगाच काळजी करत बसू नये.

10:27 (IST) 20 Apr 2025
कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)

आवडीच्या कामांवर भर द्याल. सरकारी कामे मार्गी लागतील. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. कौटुंबिक सौख्याचा प्रथम विचार करावा. मनातील सुप्त इच्छा पूर्ण कराल.

10:11 (IST) 20 Apr 2025

आता मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा, बक्कळ पैसा प्राप्त होणार; दर रविवारी सूर्याच्या 'या' एका प्रभावी स्तोत्राच्या पठणाने प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार

Surya Powerful Stotra: ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते. सूर्य पिता, आत्मा, समृद्धी, मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा या गोष्टींचा कारक ग्रह आहे. ...अधिक वाचा
10:04 (IST) 20 Apr 2025

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)

क्षणिक सुखाने खुश व्हाल. कामाचा वेग वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.

09:36 (IST) 20 Apr 2025

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)

करमणुकीत जास्त वेळ घालवाल. जोडीदाराचे भरभरून कौतुक कराल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. आवक जावक यांचा मेळ घालाल.

08:49 (IST) 20 Apr 2025

मेष आजचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबात तुमचा दबदबा वाढेल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. गुंतवणुकीचा नवीन मार्ग शोधाल.

08:24 (IST) 20 Apr 2025

येणाऱ्या ६ दिवसानंतर तीन राशींचा बँक बॅलन्स वाढणार; सूर्य-गुरूचा अर्धकेंद्र योग देणार नोकरी, व्यवसायात प्रगती

Ardhakedra Yog: २५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी सूर्य आणि गुरू एकमेकांपासून ४५ डिग्रीवर असतील. ...वाचा सविस्तर
08:01 (IST) 20 Apr 2025

Chanakya Niti : दान नेमकं कोणाला आणि कसे केले पाहिजे? चाणक्य नीती काय सांगते? वाचा

Chanakya Niti For Life : आचार्य चाणक्य यांनी दानधर्म करण्याबद्दल काय सांगितले आहे ते जाणून घेऊ… ...सविस्तर बातमी
07:31 (IST) 20 Apr 2025

आजपासून 'या' राशींच्या लोकांसाठी चांगले दिवस? 'गजकेसरी राजयोग' बनल्याने मिळू शकते लाडू-पेढे वाटण्याची संधी, दारी येईल लक्ष्मी!

Gajkesari Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ‘गजकेसरी राजयोग’ हा काही राशींच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी… ...सविस्तर वाचा
07:03 (IST) 20 Apr 2025

Daily Horoscope : भानू सप्तमीला 'या' राशींना मिळेल भरपूर पैसा आणि प्रसिद्धी; तुमच्या नशिबात कसं येणार कष्टाचे फळ? वाचा राशिभविष्य

Dainik Rashi Bhavishya in Marathi : तर तुमच्या राशीचा रविवार हसत-खेळत जाणार का हे आपण जाणून घेऊया... ...सविस्तर वाचा