Daily Horoscope In Marathi 13 September 2025 : आज १३ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्टी तिथी असणार आहे. आज हर्षण योग आणि कृतिका नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ९ वाजून ११ मिनिटांनी सुरु होईल ते १० वाजून ४४ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज शनिवारी कोणत्या राशीच्या कुंडलीत सुखाचा पाऊस पडणार जाणून घेऊयात…
१३ सप्टेंबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Horoscope Today In Marathi 13 September 2025 )
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)
फसव्या आश्वासनांपासून दूर रहा. आत्मविश्वासाने कामे करा. अनेक दिवसांपासूनच्या अडचणी दूर होतील. आर्थिक बाजू सुधारेल. प्रवास लाभदायक ठरू शकतील.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)
कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. व्यावसायिक गोष्टीतील संभ्रम टाळावा. जीवनस्तर सुधारण्याचे योग. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. जोडीदाराला खुश कराल.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)
दिवस आपल्या मनासारखा जाईल. धडपड करून का होईना काम पूर्ण कराल. कामांना अपेक्षित गती येईल. शाश्वत प्रयत्न करत रहा. हातातील कामात निष्काळजीपणा करू नका.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)
व्यावहारिक स्पष्टता ठेवावी. भावंडांची चिंता लागून राहील. करियर व वैयक्तिक चिंता सतावतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. समस्यांचे निराकरण करण्यात यश येईल.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)
आपली ठाम मते मांडावीत. प्रसंगांना कणखरपणे सामोरे जा. व्यापारी वर्गाने परिस्थिती लक्षात घेऊन वागावे. मंदी चिंता वाढवणारी असेल. नोकरदार वर्गाने आळस झटकून कामे करावीत.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)
घरासाठी योग्य अशी खरेदी कराल. चिकाटी सोडू नका. दिवस धावपळीचा जाईल. मात्र त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. कौटुंबिक सदस्यांचा स्नेह वाढेल.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)
कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. कामातील क्षुल्लक समस्या सोडवू शकाल. विनाकारण मन चिंताग्रस्त राहील. आपले स्पर्धक त्रस्त करू शकतात. साहसाच्या जोरावर कामे पूर्ण कराल.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)
लोक तुमचा सल्ला मानतील. रखडलेल्या कामांना मार्गी लावायला जोर लावा. काहीसा मानसिक त्रास संभवतो. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. नैराश्य टाळण्याचा प्रयत्न करा.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)
बोलण्यातून गैरसमज पसरवू नका. मानसिक अस्थिरता टाळा. नवीन ओळख लाभदायक ठरेल. निष्काळजीपणा करू नका. आत्मविश्वासाने काम करा.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today in Marathi)
सामाजिक प्रतिष्ठा चांगली मिळेल. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा होतील. अति अपेक्षा बाळगू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रलोभनांना बळी पडू नका.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today in Marathi)
लोकांच्या बोलण्याची आपल्यावर भुरळ पडू शकते. कलेत मन रमेल. अधिकार्यांच्या सहकार्याचा वापर करून घ्या. वेळेचा सदुपयोग करावा. मेहनतीला पर्याय नाही.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today in Marathi)
दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. गुरु कृपेमुळे उन्नती साधता येईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. हितशत्रूपासून सावध राहावे. मोठे व्यवहार आज टाळता आले तर पहा.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर