हिंदू धर्म आणि वैदिक ज्योतिषानुसार शनिदेवाला न्यायदेवता मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार शनि हा पाप ग्रह आहे. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत शनिची अशुभ स्थिती अडचणीची ठरते. शनिदेव तुमच्या कर्मानुसार फळ देतात, त्यामुळे त्यांना कर्मदेव असेही म्हणतात. यामुळे तुमच्यावर काय परिणाम होईल हे त्या व्यक्तीच्या कृतीवर अवलंबून असते. साडेसातीच्या अडचणी वाढतात आणि परिश्रम करूनही यश मिळत नाही. याचा अर्थ शनिदेव अशुभ स्थितीत असल्याचं कळून येतं. अशा परिस्थितीत शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्रास कमी करण्यासाठी काही उपाय ज्योतिषशास्त्रात दिले आहेत. असे मानले जाते की शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःखे दूर होतात. भारतात शनिदेवाची अनेक मंदिरे आहेत, पण मंदिरांचा महिमा आणि प्रचिती वेगळीच आहे. त्यामुळे या मंदिरात जाण्यासाठी भक्त कायम आतुर असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनी धाम, नवी दिल्ली
नवी दिल्लीतील छतरपूर रोड येथील शनी धाम मंदिरात शनिदेवाची जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. या मंदिरात दरवर्षी लाखो पर्यटक शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात. भक्तगण येथे शनिदेवाच्या नैसर्गिक मूर्तीची पूजा करतात. मंदिरातील शनिदेवाच्या मूर्तीची स्थापना २००३ मध्ये अनंत श्री विभूषित जगत गुरु शंकराचार्य स्वामी माधवश्रम जी महाराज यांनी केली होती.

शनिचरा मंदिर, मध्य प्रदेश
शनि महाराजांचे प्राचीन मंदिर मुरैना जिल्ह्यातील ऐंटी गावात डोंगरावर आहे. हे रामायण काळातील ठिकाण असल्याचे सांगितले जाते. पौराणिक कथेनुसार असे म्हटले जाते की रावणाच्या कैदेतून मुक्त झाल्यानंतर हनुमानजींनी शनी महाराजांना येथेच सोडले होते. येथे शनि पर्वताची प्रदक्षिणा केल्याने शनिदेवाच्या शापापासून मुक्ती मिळते अशी येथील लोकांची श्रद्धा आहे.

शनि मंदिर, इंदूर
शनिदेवाचे प्राचीन आणि अद्भुत मंदिर जुनी इंदूर येथे आहे. या मंदिराबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. अहिल्याबाई शनिदेवाची पूजा करण्यासाठी येथे आल्या होत्या असे सांगितलं जाते. त्याच वेळी, आणखी एका आख्यायिकेनुसार, मंदिरात स्थापित केलेल्या शनिच्या मूर्तीच्या जागी पूर्वी रामाची मूर्ती होती, असे सांगितले जाते. एका शनि अमावस्येला ही मूर्ती या जागी आल्याची आख्यायिका आहे. हे मंदिर स्वंयभू असल्याचं सांगितलं जातं.

Gudipadwa 2022: हिंदू नववर्षात शनिदेव राजा, तर बृहस्पती मंत्रिपदी; या राशींचं नशिब उजळणार

शनि शिंगणापूर, महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात ३०० वर्ष जुने शनि मंदिर आहे. या मंदिरात कोणतीही भिंत किंवा छत नाही. पाच फूट उंचीचा काळा दगड आहे. याची येथील लोक शनिदेव म्हणून पूजा करतात. सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या शनी शिंगणापूर गावात एकाही घराला दरवाजा नाही. एवढेच नाही तर लोक घरात कपाट, सुटकेस वगैरे ठेवत नाहीत.

Grah Transit 2022: एप्रिलमध्ये नऊ ग्रह करणार राशी बदल, ‘या’ राशींसाठी धनलाभाचा योग

थिरुनाल्लर मंदिर, तामिळनाडू
श्री दरबारन्येश्वर मंदिर हे तिरुनाल्लर, पाँडिचेरी येथे स्थित एक प्रसिद्ध शनी मंदिर आहे आणि हे मंदिर तामिळनाडूच्या अगदी जवळ आहे. या मंदिराला नवग्रह मंदिर असेही म्हणतात. हे मंदिर अभय वरद हस्त पूर्वाभिमुख आहे. हे मंदिर कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे आणि भारतातील शनिदेवाचे सर्वात पवित्र मंदिर आहे. चोल राज घरण्याला या मंदिराचे संस्थापक मानले जातात. या मंदिरात पूजा केल्यावर नल राजाला शनिदेवाच्या प्रभावामुळे होणाऱ्या रोगांपासून मुक्ती मिळाली होती.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devotees faith five saturn temples in india rmt
First published on: 31-03-2022 at 13:59 IST