Diwali 2025 Horoscope: दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. अश्विन अमावस्येला घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी धन-संपत्ती आणि आयुष्यात सुख, शांती, समृद्धी देणाऱ्या देवी लक्ष्मीची लोक यथाशक्ती पूजा-आराधना करतात. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिला विविध नैवेद्य अर्पण करतात, तिच्या आवडीचे मंत्र, स्तोत्र म्हणतात. यंदा २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन केले जाईल. ज्योतिषशास्त्रात अशा काही राशी आहे ज्यांच्यावर सदैव देवी लक्ष्मीची असीम कृपा असते, त्यामुळे लक्ष्मी पूजनाचा काळ त्या राशीच्या व्यक्तींसाठी नक्कीच लाभदायी असतो.

लक्ष्मीपूजनाचा काळ या राशींसाठी लाभदायी

कर्क (Kark Rashi)

कर्क रास ही देवी लक्ष्मी खूप प्रिय रास आहे. कारण, या राशीचा स्वामी ग्रह चंद्र असून चंद्राला देवी लक्ष्मीचा भाऊ म्हटले जाते. त्यामुळे लक्ष्मी पूजनाचा काळ कर्क राशीला देवी लक्ष्मीची विशेष कृपा असू शकते. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याबरोबर आर्थिक लाभही मिळू शकतो. कर्जमुक्तीबरोबर पैशांची बचत करू शकता. जीवनात अनेक प्रकारचे आनंद येऊ शकतात. सुख-शांती, समाधान मिळू शकेल. तुम्ही अनावश्यक खर्चापासून दूर राहू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील.

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीवरही देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते. त्यामुळे या राशीच्या जीवनात अनेक प्रकारच्या आनंदाचे क्षण येतील. नवीन काम आणि व्यवसायासाठी हा काळ खूप शुभ आहे. या काळात केलेल्या शुभ कार्यामुळे तुम्हाला भरपूर यश मिळू शकते, त्यामुळे रखडलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. तुम्हाला तुमच्या गुरु आणि वडिलांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. व्यवसायातही भरपूर फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल, भौतिक सुखाची प्राप्ती होईल.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीवरही देवी लक्ष्मी सदैव प्रसन्न असतात. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या काळात भरपूर पैसे कमावण्याव्यतिरिक्त, तुम्ही भविष्यासाठी पैसे वाचवू शकता. कामाच्या संदर्भात तुम्ही देश-विदेशातही प्रवास करू शकता, यामुळे तुम्हाला भविष्यात बरेच फायदे मिळू शकतात. यावेळी तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. यामुळे तुमच्यात शांतता निर्माण होऊ शकते. कुटुंबातील तणाव कमी होत सर्वांना आनंदाने जीवन जगता येईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)