Mahalaxmi Rajyog In Diwali 2025: ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो, शिवाय त्यातून शुभ संयोग आणि राजयोग निर्माण होतात, ज्याचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होतो.
पंचांगानुसार, येत्या दिवाळीत २१ ऑक्टोबर रोजी चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे महालक्ष्मी राजयोग निर्माण होत आहे, हा राजयोग दिवाळीतच निर्माण होत असल्याने या काळात देवी लक्ष्मीची विशेष कृपा पाहायला मिळेल. १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी हा राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल.
महालक्ष्मी राजयोग देणार सुख-संपत्ती
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा राजयोग भौतिक सुखाचा वर्षाव करणार असेल. हा योग तुमच्या भौतिक सुख आणि वाहनाच्या स्थानावर निर्माण होत आहे. यामुळे तुमची आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग अत्यंत सकारात्मक फळ देणारा असेल. हे गोचर तुमच्या धन आणि वाणीच्या स्थानावर असेल. ज्यामुळे आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.
मकर
महालक्ष्मी राजयोगाचा प्रभाव मकर राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. हा योग तुमच्या कर्म भावात निर्माण होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी असेल. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)