ज्योतिष शास्त्रात प्रत्येक कामासाठी एक शुभ वेळेचा उल्लेख केला गेला आहे. कर्ज देणे किंवा फेडणे, पैशांची देवाण-घेवाण आणि गुंतवणुकीसाठीही एक शुभ वेळ असते. पैशांच्या देवाणघेवाणीसाठी शुभ वेळ आणि दिवस हे नक्षत्र, तिथी आणि सूर्य संक्रांतीच्या आधारावर सुनिश्चित केले जातात. तर, जाणून घेऊया पैशाचे व्यवहार आणि गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आणि वेळ कोणती आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, अश्विनी, मृगाशिरा, पुनर्वसु, पुष्य, श्रवण, धनिष्ठा, शतभिषा, स्वाती, अनुराधा, चित्रा, विशाखा आणि रेवती या १२ नक्षत्रांमध्ये पैशांशी संबंधित व्यवहार करणे शुभ असते. तसेच या नक्षत्रांमध्ये मेष, कर्क, तूळ आणि मकर राशीमध्ये ५, ८ आणि ९ स्थाने शुभ असतील तर पैशाचे व्यवहार, गुंतवणूक, बँकांमध्ये पैसे जमा करणे, गुंतवणूक करणे इत्यादी करणे खूप शुभ आहे.

homosexual Women
समलिंगी स्त्रियांना असतो अकाली मृत्यूचा धोका, पण नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!
lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

यंदाचा व्हॅलेंटाइन वीक ‘या’ राशीच्या व्यक्तींसाठी ठरणार खास; मनातील इच्छा होणार पूर्ण

एखाद्याकडून पैसे उधार घेण्यासाठी मंगळवार हा दिवस निवडू नये. कारण ज्योतिष शास्त्रात असे मानले जाते की या दिवशी घेतलेले पैसे लवकर फेडता येत नाहीत. दुसरीकडे, जर तुम्हाला कर्जाची परतफेड करायची असेल, तर तुम्ही मंगळवार निवडू शकता. या दिवशी कर्ज फेडल्यास कर्जापासून कायमची मुक्तता मिळते.

ज्योतिष शास्त्रानुसार बुधवारी एखाद्याला उधार देणे अशुभ मानले जाते. या दिवशी धारीवर दिलेले पैसे परत मिळण्यास बराच वेळ लागतो, असे मानले जाते. अशा स्थितीत एखाद्याला कर्ज देण्यासाठी चुकूनही हा दिवस निवडू नये.

‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ! शेंगदाणे विकणारा व्यक्ती रातोरात बनला स्टार

ज्योतिष शास्त्रानुसार बुधवार कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी अतिशय शुभ दिवस आहे. असे मानले जाते की या दिवशी गुंतवणूक केल्यास चौपट नफा मिळतो.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)