Rashi Bhavishya In Marathi 2 October 2025 : आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी असणार आहे. आज धृती योग जुळून येईल आणि श्रवण नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ १ वाजून ३४ मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजून २ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज दसरा असणार आहे. या सणाला विजयदशमी असेही म्हटले जाते. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी अनेक वर्षांपासून रावण दहन करण्याची आणि घरोघरी शस्त्र पूजन करण्याचीह प्रथा आहे. तर कोणत्या राशीसाठी दसऱ्याचा दिवस सोन्यासारखा असणार आहे जाणून घेऊया…

२ ऑक्टोबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Dainik Rashi Bhavishya In Marathi 2 October 2025 )

आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)

अति घाईत निर्णय घेऊ नका. मनावर ताबा ठेवा. जटिल समस्येवर तोडगा निघू शकेल. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)

हातातील काम पूर्ण होईल. आज अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. जवळचा प्रवास सुखाचा होईल. प्रेमातील व्यक्तीसाठी नातेसंबंध दृढ करणारा दिवस.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

दिवसभर कामाची लगबग राहील. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. दुसर्‍यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सहकार्‍यांना कमी लेखू नका. टीमवर्कचे महत्त्व लक्षात घ्यावे.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)

धावपळीचा दिवस राहील. आपल्याच नादात दिवस घालवाल. स्वत:च्याच मताला चिकटून राहाल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मित्राची गाठ पडेल.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)

सरकारी कामे पुढे सरकतील. प्रकृतीस जपावे. वादविवादात आपली सरशी होईल. व्यावसायिक क्षेत्रात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. फार काळजी करू नये.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)

स्वत:वर कायम विश्वास ठेवावा. विजय तुमचाच होईल. आपली जबाबदारी ओळखून काम कराल. तुमची प्रतिमा उंचावेल. अधिकची कामे अंगावर पडतील.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)

निर्णयाचा पुनर्विचार करावा. जुनी देणी फेडाल. घरात शांतता ठेवावी. अनावश्यक खर्चाला कात्री लावावी. दिनचर्येत थोडासा बदल करून पाहावा.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)

नोकरी व्यवसायात नवीन काम मिळेल. उत्साहात दिवस जाईल. दिवसाची सुरुवात संपर्क साधण्यात जाईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. खोट्या गोष्टींचा आधार घ्याल.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)

दिवस कामात व्यस्त राहील. खर्चिक कामे निघतील. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नवीन ओळख वाढवताना सावध रहा. कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)

नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. हलगर्जीपणा करून चालणार नाही. दिवस उत्साही असेल. आनंदी मनाने कार्यरत राहाल. प्रलोभनाला भुलू नका.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)

रखडलेली कामे हळूहळू पुढे सरकतील. व्यायामात खंड पडू देऊ नका. मुलांची चिंता सतावेल. जि‍भेवर ताबा ठेवावा. आव्हानांचा सामना करावा.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)

नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. आततायीपणे कामे करू नका. आत्ममग्न राहाल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर