Dussehra Shani Nakshatra Parivartan: शनी नक्षत्र बदलणार आहेत आणि तेही दसऱ्याच्या वेळी. शनी ३ ऑक्टोबरच्या रात्री उत्तराभाद्रपदा नक्षत्रातून बाहेर येऊन पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात जातील आणि ४ राशींच्या जीवनात चांगले बदल आणतील.
ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायाचे देव आणि दंडाधिकारी मानले जाते. कारण शनी कर्मांप्रमाणे फळ देतात. शनी दीड वर्षांनी गोचर करतात आणि मार्च २०२५ मध्ये ते मीन राशीत आले आहेत. तसेच ते मधूनमधून नक्षत्र बदलतात. यावर्षी २ ऑक्टोबरला दसरा आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी शनी नक्षत्र बदलून गुरुच्या पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात जातील. त्यामुळे ४ राशींना खास फायदा होऊ शकतो.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
शनीचे नक्षत्र बदलणे मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. या लोकांना नोकरी-व्यवसायात प्रगती मिळेल. पदोन्नती मिळेल. अडकलेले पैसे मिळतील, त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणूक करू शकता.
कर्क राशी (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांनाही शनी फायदा देतील. करिअरसाठी केलेल्या योजना आता पूर्ण होऊ लागतील. व्यवसायात वाढ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक अडचण दूर होईल. अपूर्ण इच्छा पूर्ण होईल. घरात आनंद राहील.
मकर राशी (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांना शनीचे नक्षत्र गोचर धनलाभ देऊ शकते. अचानक अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा मालमत्तेतून फायदा होऊ शकतो. विदेशातूनही लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा वेळ यश देणारा आहे.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
शनी कुंभ राशीचे स्वामी आहेत आणि या राशीच्या लोकांवर ते खास कृपा करतात. ३ ऑक्टोबरला होणारे शनीचे नक्षत्र गोचरही या लोकांना फायदा देईल. नोकरीत बदल होऊ शकतो. भाग्याच्या साथीनं कामं पूर्ण होतील. कुटुंबात सुख-शांती वाढेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)