– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Yearly Rashi Bhavishya 2023 : राशीभविष्यानुसार आपल्या राशीसाठी येणाऱ्या वर्षात काय सांगितलं आहे आणि काय संकेत आहेत हे पाहूयात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष –

आरोग्याच्या दृष्टीने काही कटकटी निर्माण होऊ शकतात. काहीसा चिंता व काळजी वाढविणारा असा हा काळ असेल. तरी कुटुंबाकडून मिळणारी साथ व विश्वास यांच्या जोरावर आपण अपेक्षित यश मिळवू शकाल. कोणत्याही प्रकारच्या वादात न अडकता त्यातून योग्य मार्ग कसा काढता येईल याचाच विचार करावा. वैवाहिक दृष्टीकोनातून सुयोग्य काळ. मोठे प्रवास सुखकर होतील. नोकरदार महिलांना सुसंधी चालून येतील. कौटुंबिक सौख्य चांगले राहून काही जुने आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडतील. प्रेम प्रकरणात अहंकाराला थारा न दिलेलाच बरा. समाजात वेगळे स्थान निर्माण करता येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात उत्तम गती लाभेल. गायन कलेची आवड असणाऱ्यांना उत्कृष्ठ नावलौलिक मिळविता येईल. स्त्रियांची नटण्या-मुरडण्याची हौस पूर्ण होईल. उधार-उसनवारीतून फसवणुकीची शक्यता दिसून येते त्यासंधर्भात सावधानता बाळगावी. नोकरी-व्यवसायातील काही कामे मंदगतीने होतील. मैत्रीतील विश्वासार्हता एकदा तपासून घ्यावी लागेल. आवडती पुस्तके वाचण्याचा छंद जोपासण्यास वाव मिळेल. प्रवास घडतील.

वृषभ –

विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणाच्या दृष्टीने काळ उत्तम आहे. तसेच विद्यार्थी कौतुकास पात्र होऊन बक्षिसाचे मानकरी ठरतील. काही नवीन छंद व व्यासंग वाढविण्यास हरकत नाही. नवीन विचारांना साहसाची जोड मिळेल. महिला ईश्वरोपासनेत व देवभक्तीत काळ व्यतीत करतील. कानाचे आजार उद्भवू शकतात त्यावर वेळीच औषधोपचार करावेत. शक्यतो इतरांच्या सल्ल्यापेक्षा स्व:ताच्या मतावर ठाम रहा. गृहसौख्य साधारण राहील. कुटुंबावरील प्रेमासाठी मागेपुढे न पाहता कष्ट घ्यावे लागतील. हाती घेतलेल्या कामात उत्साह महत्वाचा आहे हे लक्षात ठेवा. अति भावनिकता काही ठिकाणी नुकसानदायक ठरू शकते. शक्यतो कोणाच्याही आहारी जावू नका. व्यवहारात काटेकोरपणा ठेवावा. भावंडाना मदत करण्याची संधी दवडू नका. आपल्या आनंदाला आत्मविश्वासाची जोड मिळेल याच बळावर काही महत्वाची कामे उरकून घ्या. गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी. महिलांना गृहसौख्य चांगले लाभेल व घरातील वातावरण पण आनंदी राहील. मुलांचे काही बदललेले वागणे चिंतेचे कारण ठरू शकतात. लेखक वर्गाला त्यांच्या कामातून आर्थिक प्रगती साधता येईल.

नवीन वर्षात ‘या’ राशींच्या लोकांना होऊ शकतो प्रचंड धनलाभ; पण ‘या’ लोकांनीही सावध राहण्याची गरज

मिथुन –

गृहसौख्य व आर्थिक ताळमेळ यांबाबत हा आठवडा काहीसा असमाधानकारक असेल. कुटुंबाच्या प्रगतीचा विचार आपण नेहमीच करत असता पण हि प्रगती साधताना आर्थिक बाबतीत सावधानता बाळगणे फार महत्वाचे ठरणार आहे अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लेखक, पुस्तक विक्रेते, यात्रा कंपनी व पर्यटन व्यवसाय यांचे संचालक यांना नवीन योजना आखता येतील व त्यातून उत्तम प्रगती साधने शक्य होईल. महिला धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च करतील. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व आकलनशक्तीला वाव मिळेल. भावंडांच्या बाबत थोडे सामोपचाराचे धोरण ठेवावे. मानसिक चंचलतेला आवर घालताना आपली दमणूक होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्याची गरज आहे. महत्त्वाकांक्षेने काही गोष्टी यशस्वी करण्याचा प्रयत्न करावयास हरकत नाही. पण चोख व्यवहारी दृष्टीकोन बाळगावा लागेल. हाती घेतलेले लिखाण चिकाटीने पूर्ण कराल. शेवटी मनाप्रमाणे आर्थिक प्राप्ती होईल. निराशेवर जाणीवपूर्वक प्रतिबंध घालावा लागेल. महिला आपल्या प्रेमळ बोलण्याने सर्वांचे मन जिंकून घेतील. विद्यार्थ्यांना बौद्धिकदृष्ट्या हा काळ चांगला आहे. काही कामांमध्ये दिरंगाई होण्याची शक्यता आहे. उष्णता व रक्तदाब यांवर वेळेवर नियंत्रण मिळवा.

कर्क-

पराक्रम व स्वकर्तबगारीवर अनेक उलाढाली यशस्वी करण्याचा प्रयत्न आपण करणार असाल तर स्वभावातील वाढलेला मानीपणा बाजूला सारूनच पुढे जावे लागेल हे ध्यानात धरावे. कोणत्याही क्षणिक मोहाला बळी पडू नका. विशेषत: या काळात स्त्रियांपासून त्रास संभवतो. काही खर्च आवाक्याबाहेर जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. भावंडांच्या आनंदात सहभागी व्हाल. महिलांनी पतीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच गर्दीच्या ठिकाणी वावरताना मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. कौटुंबिक कुरबुरींना हसत-खेळत सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. अडथळ्यातून मार्ग काढतच मार्गक्रमण करावे लागणार आहे. पूर्वार्ध मानसिक शांती व कौटुंबिक सौख्य देणारा असेल. सामाजिक कार्यात सहभागी होता येईल. अध्यात्माची आवड असणाऱ्या महिलांना प्रगती करता येईल. मुलांच्या बाबतीत अपेक्षाभंग होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यावी. व्यावसायिकांना त्यांच्या कामातून उत्कृष्ठ धनलाभ संभवतो. काही कामात आप्तेष्ठांना मदत करण्याचा लाभ मिळेल. जवळच्या यात्रेतून मानसिक आनंद मिळाल्याने आपण खुश असाल. विद्यार्थ्यांनी थोडे कष्ट घेण्याची तयारी ठेवावी.

नवीन वर्ष सुरू होताच ‘या’ राशींचे भाग्य चमकणार? शनिदेव देणार प्रचंड पैसा कमावण्याची संधी

सिंह –

आपला सांपत्तिक दर्जा उत्तम राहून आर्थिक लाभ संभवतात. मैत्रीच्या संबंधातून अनेक कामे मार्गी लागतील. नवीन ओळखीतून विवाहेच्छुकांचे विवाह जुळण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात उत्तम गती लाभून यश संपादन करता येईल. भावंडाच्या बाबत कसलीशी चिंता लागून राहील. कोर्ट कचेरीच्या कामात सावधनता गरजेची राहील. सरकारी नोकरदार व महिला वर्ग यांच्या अपेक्षांची पूर्तता होताना दिसेल. वैवाहिक सौख्य चांगले राहील. काही गोष्टी मात्र प्रयत्न साध्यच पूर्ण कराव्या लागतील. आपल्या कर्तबगारीला वेगळे वळण लागणार नाही याची काळजी घ्या. नवीन व्यवसायास सुरुवात करणाऱ्यांना हाताखालील नोकर चांगले मिळतील. मात्र व्यवसाय वृद्धी साठी धरसोडपणा बाजूला सारूनच निर्णय घ्यावे लागतील. घरात तसेच कामाच्या ठिकाणी जेष्ठांचा विरोध सहन करावा लागेल. स्व:ताचे व जोडीदाराचे प्रकृती स्वास्थ जपावे. महत्वाकांक्षा वाढून आर्थिक लाभही काही प्रमाणात संभवतो. काही नवीन संधी चालून येतील त्यांचा विचार सकारात्मकतेने करावा. मुलांच्या अडचणींकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे याचे भान राहू द्या. महिलांना काही कामांमध्ये जेष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. मानसिक ताण व निराशा प्रयत्नपूर्वक दूर सारावी.

कन्या –

अध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना आपल्या कामात प्रगती करता येईल. आपल्या स्वभावातील सद्गुणांची वाढ होऊन काही चांगल्या संधी मिळतील. दूरवरच्या प्रवासाचे योग जुळून येतील. काही स्तरावर जपणूक गरजेची राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या मताला व निर्णयाला निकषाने पाळावे लागेल अन्यथा त्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागण्याची वेळ येऊ शकते. आर्थिक आवक समाधानकारक राहील. विद्यार्थ्यांनी नशिबाच्या जोरावर सर्व सोडून देऊ नये. प्रयत्न केल्यास ग्रहयोगांची साथ नक्की मिळेल. घरातील कुरबुरींना सामंजस्याने दूर करण्याचा प्रयत्न करा. क्षुल्लक कारणांवरून होणारे मतभेद जाणीवपूर्वक दूर करा. तसेच जोडीदाराच्या आरोग्याचीही तितकीच काळजी घ्या. विवाहाची बोलणी काही काळासाठी पुढे ढकलावीत. अपचन व पोटाचे विकार बळावू नयेत यांकडे लक्ष द्या. विद्यार्थी मित्रांनी नेटाने व जोमाने अभ्यासाची तयारी करावी. आपण हितशत्रूंवर मात करण्यात यशस्वी व्हाल. महिलांनी अनावश्यक खर्च टाळता आला तर पाहावा. वाहने जपून चालवावीत. तसेच प्रवासातही काळजी घ्यावी. नातेवाईकांचा दुरावा वाढेल.

तूळ –

आरोग्याच्या बाबत आपण जागरूक राहणे गरजेचे आहे. स्वभावातील आपसूकच येणारा चिडचिडेपणा प्रयत्नपूर्वक दूर सारण्यातच शहाणपणा आहे हे ध्यानी धरा. कोणत्याही प्रकारच्या चिंता, काळज्या यांना अवास्तव महत्व देवू नका. काही गोष्टी येणाऱ्या काळावर सोपवाव्यात. जोडीदाराचे हट्ट प्रेमळपणे हाताळा. तसेच त्यांच्या प्रकृतीचीही काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक तत्परतेची गरज आहे. कोणत्याही वादात अडकणार नाही याची महिलांनी दक्षता घ्यावी. वैवाहिक सौख्य चांगले लाभेल. विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळून चांगली प्रगती साधता येणे शक्य होईल. आरोग्याच्या काही तक्रारी त्रासदायक ठरतील. कर्तबगारीतून लोकप्रियता साधता येईल. लेखक, प्रकाशक यांच्या नवीन कल्पनाशक्तीला चांगला प्रतिसाद मिळेल. मैदानी खेळाडू आपले गुण अधिक उठावदारपणे सिद्ध करतील. प्रतिस्पर्धी व गुप्त शत्रू यांच्यावर मात करणे शक्य होईल. मात्र कोणत्याही प्रकारच्या गैरसमजांना दूर सारा. महिलांनी कौटुंबिक स्वास्थ जपावे. नातेवाईक नाराज होणार नाहीत याची काळजी व सामोपचार यांना सध्या प्राधान्य द्यावे.

तूळ राशीसाठी २०२३ वर्ष कसे असेल? बुधादित्य राजयोग बनल्याने मिळू शकतो प्रचंड धनलाभ; आरोग्य कसे असणार?

वृश्चिक –

स्थावर व जमीनजुमला यांमधून काही प्रमाणात आर्थिक लाभाची शक्यता दिसून येते. मात्र या प्रकारच्या व्यवहारातून आपण आपले नातेवाईक यांच्यापासून दूर जाणार नाही ना याची एकदा खात्री करून घ्यावी. काही कामातील दिरंगाई व येणाऱ्या अडचणी निरुत्साह वाढवू शकतात. कोणत्याही अपेक्षाभंगाला मनात घर करू देऊ नये. विद्यार्थी आपल्या बुद्धीची चमक दाखवू शकतात. काहीश्या संमिश्र परिस्थितीतहि आपण कामाच्या ठिकाणी विरोधकांची मते खोडून काढण्यात यशस्वी व्हाल. मित्रसुख उत्तम लाभेल व त्यांच्या सोबत मिष्टान्न भोजनाचा आनंद घ्याल. आपण प्रत्येक कामात प्रयत्नशील रहाल. जवळच्या प्रवासाची आवड पूर्ण होईल. कामातील साहस आपणास थोड्या प्रमाणात हेकेखोर बनवेल. आपल्या सुप्त गुणांना वाव मिळून कलेचा छंद जोपासण्याची चांगली संधी चालून येईल त्याच लाभ घ्या. आपल्या कामातील चोखपणाच वरिष्ठांकडून प्रसंशला जाईल. वर्षाचा मधला काळ गतिमान करणारा असेल. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत पण त्यासाठी नाराज होण्याची गरज नाही. आपला मान व अधिकार योग्य तऱ्हेने वापरायला हवा. विद्यार्थ्यांनी एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करावा. महिला मनोरंजनात काळ व्यतित करतील.

धनु –

हे वर्ष काहीसे खर्चिक व आर्थिक बोजा वाढविणारा ठरू शकतो त्यासाठी योग्य नियोजनच महत्वाचे ठरणार आहे याचा विसर पडू देवू नका. काही बाबतीत आपला मान वाढून प्रतिष्ठा मिळेल. तसेच या काळात स्त्रियांकडून लाभ संभवतो. कोणत्याही प्रकारचा मत्सर व द्वेष यांचा परिणाम हा भांडणात होवू शकतो त्यासाठी शब्द जपूनच वापरावेत. घरातील जेष्ठांची काळजी घ्यावी. महिलांना बंधूसौख्य उत्तम लाभेल. विद्यार्थ्यांची शास्त्र अभ्यासाची आवड पूर्ण होईल. लहान-लहान प्रवास योग संभवतात. घरातील वातावरण आनंदी राहील. समाधानी वृत्ती जोपासा. उच्चरक्तदाब व हृदयविकाराचे त्रास असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. कोणत्याही कामातील उशीर, हा ते काम होणार नाही असे दर्शवत नाही, तर अधिक जोमाने कामाची गरज दर्शवितो. चटकन नाराज होऊन मागे फिरणे व विनाकारण निराश होणे या मनोवृत्तीला दूर सारण्याची अत्त्यंत गरज आहे. भावंडांची जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता आहे. गायन कलेची आवड जोपासण्याची संधी मिळेल. महिलांना वैवाहिक समाधानकारक राहील. काही स्तरावर उन्नती व भरभराट होईल. विद्यार्थ्यांनी चिकाटी ठेवावी.

२०२३ च्या ‘या’ महिन्यात शनिची साडेसाती संपून धनु राशीला प्रचंड धनलाभाची संधी; नववर्षात आरोग्य व प्रेम देणार का साथ?

मकर –

ध्येय, उद्दिष्ठ साधण्यासाठी चाललेली धडपड व मनाची वाढलेली चंचलता यांतून सध्या मार्ग काढावा लागणार आहे. क्षणिक सौख्याच्या मागे लागून कोणत्याही प्रलोभनात अडकू नका. डोळे व पायाचे त्रास बळावू नयेत याची काळजी घ्या. सर्व ठिकाणी व्यावहारिकता उपयोगी पडत नाही तर कधीकधी हातचे सोडूनही विचार करावा लागतो. व्यावसायिक दृष्टीकोनातून नवीन वेगळे विचार मनात घोळू लागतील त्यांना योग्य दिशा दिल्यास उत्तम प्रगती व आर्थिक भरभराट शक्य होईल. महिलांना कौटुंबिक स्वास्थासाठी कष्ट घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांनी उद्दीष्ट व दिशा यात गल्लत करू नये. आरोग्यात सुधारणा होणारे ग्रहयोग आहेत. आर्थिक प्राप्ती बरी राहिल्याने आपण मनासारख्या गोष्टी खरेदी करू शकाल. महिला वर्ग मौल्यवान वस्तू खरेदी करतील. अर्थात या सर्व गोष्टी मिळविण्यासाठी कष्ट ही घ्यावेच लागणार आहेत याचा विसर पडता कामा नये. प्रवास घडतील. सामाजिक व अध्यात्मिक प्रगती साठी आपणाकडून प्रयत्न होतील. विद्यार्थ्यांनी काही बाबतीत अपेक्षाभंगाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

कुंभ –

आगामी काळातील होणाऱ्या मोठ्या व अधिकारी लोकांच्या ओळखींचा परिणाम काही अपेक्षित व अनपेक्षित बदल घडविण्यास कारणीभूत ठरेल. घरातील जेष्ठ व कामाच्या ठिकाणचे वरिष्ठ यांच्याशी शक्यतो मतभेद टाळा. सरकारी कामात अडथळ्यातून व विलंबातून मार्ग काढणे फायदेशीर ठरेल. घरातील वयस्कर व्यक्तींची योग्य काळजी घ्यावी लागेल. व्यावसायिकांनी श्रद्धा व सबुरीचे धोरण ठेवावे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी सामोपचाराचे धोरण ठेवावे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाखाली यश साध्य करता येईल. महिलांनी आपल्या कामाशीच काम ठेवावे. फक्त उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करावे. वर्ष मध्या नंतर कर्तुत्वाला मिळणारा वाव पण त्यात सहज साध्य नसणारी उर्जितावस्था यांतून अनेक काळज्यांना आपण आमंत्रण दिलेले असू शकते व त्यांना वेळेवर दूर सारणे हेही आपल्याच हातात आहे याचा विसर पडलेला आहे अशी आपली अवस्था आहे. सर्व गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत याची जाणीवच त्रासदायक असते. लहान-सहान कौटुंबिक प्रश्न फार ताणून मोठे करू नका. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. लहान-मोठ्या प्रवासातून थोऱ्यामोठ्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेता येईल. महिला मैत्रीतून नवीन कल्पना साकारू शकतील. हाताखालील माणसांकडून इच्छापूर्ती होईल. काही स्तरावर दर्जा उंचावेल.

३० वर्षांनी शनिचा कुंभ राशीत प्रवेश, गुरुदेवही प्रसन्न! २०२३ मध्ये तुम्हीही होणार श्रीमंत? प्रेम व आरोग्य कसे असेल?

मीन –

राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा नावलौकिक होण्यास गोचर ग्रह भ्रमण सहाय्यकारी असेल. कोर्ट कचेरीच्या कामातून जुन्या स्थावराची अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता दिसून येते. भागीदारीचे व्यवहार मनाप्रमाणे होऊन त्यातून समाधानकारक लाभ संभवतो. भावंडांची चिंता मनात घर करून राहील. शिक्षण, नोकरी याबाबत मनाजोगी प्रगती घडताना दिसून येईल. हळू-हळू आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल सुरु होईल. महिलांनी जोडीदाराचे प्रश्न अगदीच दुर्लक्षु नयेत. वाहन चालविताना सतर्क राहावे. जुनी गुंतवणूक फळाला येईल. या काळात व्यापार-उदिमाला चालना मिळेल, पण त्यातही क्षणिक अडचणींवर मात करतच पुढे जावे लागेल. विशेषतः स्त्रीवर्गाकडून थोड्या प्रमाणात त्रास संभवतो. चैनीवर मोठ्या प्रमाणात खर्च कराल. व्यावसायिकरित्या विचार करता आर्थिक बाबतीतचे प्रश्न मानसिक कोंडी वाढविणारे ठरू शकतात. एखादे कोर्ट प्रकरण अचानकपणे सामोरे येऊन डोकेदुखी वाढवू शकते. कोठेही भावनिक न होता कुठे थांबायचे हे ठरवून घ्या. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते पण ते वाटणे तात्पुरतेच आहे हे लक्षात घ्या. महिलांनी थोडे लक्ष मनोरंजनात गुंतवावे. विद्यार्थ्यांनी सहजपणे कोणावर विसंबून राहू नये.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Early horoscope 2023 read rashi bhavishya 2023 in marathi msr
First published on: 28-12-2022 at 09:56 IST