Ekadashi 2024 Date And Time, Parivartini Ekadashi Kab Hai: हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. ही तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. तसेच एका वर्षात जवळपास २४ एकादशी असतात. या वर्षी शनिवार, १४ सप्टेंबर रोजी येत असलेल्या परिवर्तनी एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला सर्व पांपासून मुक्ती मिळते व मोक्षही प्राप्त होतो असे मानले जाते. याशिवाय परिवर्तनी एकादशीचे महत्त्वही विशेष मानले जाते कारण या तिथीला भगवान विष्णू चार्तुमासातील योग निद्रा दरम्यान पाताळच्या दिशेने (कुस) बाजू बदलतात. चला जाणून घेऊया परिवर्तनी एकादशीची तिथी आणि शुभ मुहूर्त…

परिवर्तिनी एकादशी तिथी २०२४

वैदिक कॅलेंडरनुसार, परिवर्तिनी एकादशी तिथी १३ सप्टेंबर रोजी रात्री १०:३१ वाजता सुरू होईल आणि १४ सप्टेंबर रोजी रात्री ८:४२ वाजता समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीला आधार मानून परिवर्तिनी एकादशीचे व्रत १४ सप्टेंबरला ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा – एका वर्षानंतर तूळ राशीत निर्माण होणार लक्ष्मी नारायण राजयोग! ‘या’ राशींना अचानक मिळेल पैसाच पैसा

परिवर्तिनी एकादशी व्रत २०२४ शुभ मुहूर्त आणि योग

पंचांगानुसार परिवर्तनिनी एकादशीला सकाळी ०६:१० ते रात्री ०८:३१ पर्यंत रवि योग राहील. त्याच वेळी, यानंतर सर्वार्थ सिद्धी योग सुरू होईल. तसेच या दिवशी उत्तराषाद नक्षत्र आणि शोभन योग तयार होत आहेत, जे ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानले जातात. त्यामुळे या योगांमध्ये तुम्ही पूजा करू शकता. परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी विष्णु सहस्रनाम, श्री सूक्त इत्यादींचा जप करावा तसेच परिवर्तिनी एकादशीची कथा ऐकावी व गरजूंना दान करावे.

हेही वाचा – नुसती चांदी! सूर्य, शुक्र आणि केतूच्या युतीमुळे ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिवर्तिनी एकादशीचे महत्त्व

परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख-समृद्धी मिळते. तसेच या दिवशी दान आणि स्नान केल्याने मनुष्य मोक्ष प्राप्त करतो. तसेच, एकादशीचे व्रत पाळल्याने भगवान विष्णू तुमच्या आर्थिक अडचणी दूर करतात आणि तुमचे घर सुख-समृद्धीने भरतात. दुसरीकडे, परिवर्तनी एकादशीचे व्रत केल्याने धन-समृद्धी वाढते आणि जीवनात आनंद टिकून राहतो असे मानले जाते.