गुढीपाडव्याला दोन दुर्मिळ राजयोग! ‘या’ राशींच्या भाग्याला मिळू शकते कलाटणी; धनलाभाचे अच्छे दिन होणार सुरु?

Lucky Zodiac Signs: या राशींना गुढीपाडव्यापासून अच्छे दिन अनुभवता येऊ शकतात. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नेमकंजा कसा धनलाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया…

Extreme Rare Rajyog on Gudhi Padwa These Zodiac Signs To Get Huge Money In Bank Balance On Hindu New Year Astrology
गुढीपाडव्याला 'या' राशींच्या भाग्याला मिळेल कलाटणी (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Hindu Nav Varsh 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र नवरात्रीची सुरुवात २२ मार्च पासून होत आहे. तर याच दिवशी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हिंदू नववर्ष संवत २०८० सुरु होणार आहे. यंदाचे हिंदू नववर्ष हे दोन अत्यंत पवित्र राजयोगांसह तयार होत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मीन राशीत ५ ग्रहांचा संगम होत असून यातून गजकेसरी व बुधादित्य राजयोग तयार होत आहे. मीन राशीमध्ये गुरु ग्रहासह सूर्य, बुध, चंद्र, नेपच्यून हे चार ग्रह एकत्र येऊन गुरूसह युती करत आहेत. याचा प्रभाव तीन राशींवर अत्यंत शुभ असणार आहे. या राशींना गुढीपाडव्यापासून अच्छे दिन अनुभवता येऊ शकतात. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नेमकंजा कसा धनलाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया…

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

गुढीपाडव्यापासून ‘या’ राशींचे अच्छे दिन होणार सुरु?

धनु (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या मंडळींसाठी हिंदू नववर्षाची सुरुवात अत्यंत लाभदायक असू शकते. हे दोन्ही राजयोग आपल्या कुंडलीच्या चतुर्थ स्थानी तयार होत आहेत यामुळे आपल्याला येत्या काळात सुख व वैभवात वाढ झाल्याचे दिसून येऊ शकते. या काळात आपले आजार दूर होण्याची चिन्हे आहेत. आपल्या व्यक्तिमत्वाचे पैलू येणाऱ्या काळात उजळून येतील यामुळे तुमचा प्रभाव वाढू शकतो. पदोन्नती व पगारवाढीची संधी सुद्धा लाभू शकते. येत्या काळात तुम्हाला चैनीच्या वस्तू खरेदी करता येतील. जी मंडळी रिअल इस्टेट संबंधी काम करतात त्यांना येत्या काळात आर्थिक स्रोत वाढल्याचे जाणवू शकते.

सिंह (Leo Zodiac)

हिंदू नववर्ष हे सिंह राशीच्या मंडळींसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. बुधादित्य व गजकेसरी राजयोग हा आपल्या राशीच्या अष्टम स्थानी तयार होत आहे. येत्या काळात सिंह राशीस करिअरची नवी दिशा उलगडून अभ्यासण्याची संधी मिळेल. तुम्हाला कुटुंबासह प्रवासाचे योग आहेत. तुम्हाला वेळ वाचवण्याचे मार्ग शोधावे लागतील . धार्मिक कामात तुमचा सहभाग वाढू शकतो तसेच व्यवसायिकांना सुद्धा चांगला धनलाभ होऊ शकतो.

हे ही वाचा<< २०२३ चे पहिले चंद्र ग्रहण पौर्णिमेला! ‘या’ राशींवर प्रचंड धनलाभासह होऊ शकतो प्रेमाच्या चांदण्याचा वर्षाव

मिथुन (Mithun Zodiac)

मिथुन राशीच्या मंडळींची शनीची साडेसाती जानेवारीत दूर झाली आहे. अशात आता हिंदू नववर्षाची सुरुवात आपल्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकते. या वर्षात गुरु ग्रह आपल्या राशीच्या लाभ स्थानात असणार आहेत. तर वर्षाच्या उत्तरार्धात सूर्यदेव लाभस्थानी असणार आहे. बुधादित्य व गजकेसरी राजयोग आपल्या गोचर कुंडलीत दहाव्या स्थानी तयार होत आहेत. येत्या काळात मिथुन राशीच्या मंडळींना नोकरीच्या नव्या संधी लाभू शकतात. तसेच तुम्हाला सध्याच्या कार्यस्थळी प्रचंड मान-सन्मान सुद्धा लाभू शकतो. गुढीपाडव्यानंतर पाच दिवसातच तुम्हाला प्रचंड धनलाभाचे योग आहेत.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 15:27 IST
Next Story
१२ वर्षांनंतर गुरूच्या राशीत तयार होणार ३ मोठे राजयोग; ‘या’ राशींचे नशिब पालटणार? मिळू शकतो अपार पैसा
Exit mobile version