Aajche Rashi Bhavishya 28 July 2025 In Marathi : आज २८ जुलै २०२५ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी रात्री ११ वाजून २५ मिनिटांपर्यंत असणार आहे. रात्री २ वाजून ५४ मिनिटांपर्यंत परिघ योग जुळून येईल. संध्याकाळी ५ वाजून ३६ मिनिटांपर्यंत पूर्व-फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ७:३० वाजता सुरु होईल ते ९ पर्यंत असणार आहे. संध्याकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी मंगळ ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच आज पहिला श्रावणी सोमवार असणार आहे. सणांचा महिना अशी ओळख असणारा श्रावण हा एकाअर्थी उत्साहाचे, चैतन्यचे प्रतीक मानला जातो. पण, यातही शिवभक्तांसाठी श्रावणी सोमवारचे महत्त्व अनन्य साधारण असते. तर पहिला श्रावणी सोमवार तुमच्या राशीसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे का जाणून घेऊया…

२८ जुलै २०२५ पंचांग व राशिभविष्य (Rashi Bhavishya In Marathi, 28 July 2025)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

विद्यार्थ्यांना चांगला काल. महिला वर्ग खुश राहील. जवळच्या व्यक्तीच्या वागण्याने मन दुखावेल. इच्छा नसताना एखादे काम करावे लागू शकते. जोडीदाराची कृती खटकू शकते.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

योग्य तर्क करावा लागेल. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. गुंतवणूक लाभदायक ठरेल. योग्य मूल्यमापन करावे. अति अपेक्षा ठेऊ नका.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

मानसिक समाधान लाभेल. स्वत:ला बंधनात अडकवू नका. दिवसाची सुरुवात आनंदात होईल. आर्थिक बाजू बळकट करावी. एकाच गोष्टीचे अनेक अर्थ निघू शकतात.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

देणी-घेणी मिटतील. दिवस आळसात जाईल. अति विचार करण्यात वेळ वाया घालवाल. घराबाहेर वावरतांना योग्य काळजी घ्यावी. हट्टीपणा सोडावा लागेल.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

छंद जपण्यासाठी वेळ काढावा. दिवस अनुकूल राहील. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे. कामावर अधिक लक्ष केन्द्रित करावे.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

तडकाफडकी निर्णय घेऊ नका. शेजारधर्म पळवा लागेल. वादाचा मुद्दा जिंकाल. कशाचाही गैरफायदा घेऊ नका. मित्रांचा सल्ला लाभदायक ठरेल.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

प्रबळ इच्छेवर कामे होतील. उधार-उसनवार नको. प्रेरणा प्रामाणिक हवी. नियोजित वेळेवर केलेली कामे फळाला येतील. औद्योगिक व्यवहारात चोख रहा.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

कायदेशीर सल्ला घ्यावा. घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. कामे ठरल्याप्रमाणे होतील याकडे लक्ष द्या. मुलांचा विचार समजून घ्या. प्रलंबित येणी मिळू शकतील.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

मोठे व्यवहार करताना सावधान. अफवांवर विश्वास ठेऊ नका. परिस्थितीत सुधारणा होईल. मन विचलित होऊ देऊ नका. जोडीदाराविषयी गैरसमज टाळा.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

प्रलंबित गाठी घेता येतील. अचूक माहिती मिळवावी. बौद्धिक क्षमता वाढीस लावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. जवळचा प्रवास पुढे ढकलावा.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

जुने वाद उकरून काढू नका. मैत्रीत वादाची शक्यता. पूर्व नियोजित कामे करावीत. मनात अकारण चिंता निर्माण होऊ देऊ नका. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

घराचे व्यवहार मार्गी लावावेत. मनाची चंचलता वाढेल. फार कडक धोरण घेऊ नका. आततायीपणे कृती करू नका. बहुतांश गोष्टी काळावर सोडाव्यात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर