Planet transits in January 2023: २०२३ वर्षातील जानेवारी महिन्यात पाच प्रमुख ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहे. ज्यामध्ये १७ जानेवारीला कर्म दाता शनिदेव प्रथम कुंभ राशीत प्रवेश करतील. दुसरीकडे, १४ जानेवारीला ग्रहांचा राजा सूर्य देव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल आणि शुक्र २२ जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करेल. यानंतर १२ जानेवारीला मंगळाचा प्रवेश होईल, तर १८ जानेवारीला बुध मार्गी होईल. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. पण अशा ४ राशी आहेत, ज्यांनी या काळात स्वतःसोबत धनाची काळजी घेणे गरजेचं आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना थोडासा प्रतिकूल ठरणार आहे. या महिन्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच,या काळात तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. त्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. दुसरीकडे, जे लोक नोकरी करतात त्याचे कार्यालयात कोणाशी तरी वाद होऊ शकतात. यावेळी तुमचे काही मोठे काम थांबू शकते. तर काही अडथळे येऊ शकतात.

Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
Mangal Budh Yuti
एप्रिलमध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? १८ महिन्यानंतर २ ग्रहांची युती होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

कर्क राशी

जानेवारी महिना तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. यावेळी तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध बिघडण्याची शक्यता दिसतेय. तसेच या काळात तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवर राग येऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या काळात वाहन जपून चालवा, कारण अपघात होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी या काळात खर्च देखील जास्त होईल.

( हे ही वाचा: बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योग बनल्याने ‘या’ ६ राशींना होणार प्रचंड धनलाभ? २०२३ मध्ये मिळू शकतात चांगल्या बातम्या)

वृश्चिक राशी

पैशाच्या दृष्टीने जानेवारी महिना तुमच्यासाठी चांगला राहील, परंतु वडिलोपार्जित संपत्तीचा वाद समोर येऊ शकतो. त्यामुळे कुटुंबात कलहाचे वातावरण निर्माण होऊ शकते. यावेळी तुमच्या भावंडांसोबत तुमचे मतभेद होऊ शकतात. तसेच, जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ थांबा. तुम्ही फेब्रुवारीमध्ये नोकरी बदलू शकता.

कुंभ राशी

जानेवारी महिना तुमच्यासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता दिसतेय. कारण जानेवारीत शनिदेवाचे संक्रमण होताच तुमच्यासाठी साडे सतीचा दुसरा पर्व सुरू होईल. त्यामुळे या काळात कार्यालयातील कामाबाबत कोणतीही निष्काळजीपणा करू नये. तसेच बॉसशी वादविवाद टाळा. त्याच वेळी, तुमच्यावर काही अनावश्यक खर्च होऊ शकतात. त्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.