Kedar Rajyog 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीत राशी परिवर्तन करुन शुभ आणि अशुभ योग तयार करतात, ज्याचा प्रभाव पृथ्वीवर दिसून येतो. तसेच हे ग्रह काही योग असे बनवतात जे अनेक वर्षांनी तयार होतात. यातच आता तब्बल ५०० वर्षांनी ‘केदार राजयोग’ निर्माण झाला आहे. यावेळी ७ ग्रह चार राशीत विराजमान असल्याने हा शुभ योग घडून आला आहे. या योगाचा सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव दिसून येणार आहे. पण ३ राशी अशा आहेत, ज्यांना या काळात अपार धन आणि सुख समृध्दी लाभण्याची शक्यता आहे. तर त्या ३ राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

‘या’ राशींना धनलाभ होणार?

मेष राशी

केदार राजयोग मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या राशीच्या भाग्य स्थानी मंगळ, शुक्र आणि बुध विराजमान आहेत तर सूर्य दहाव्या भावात विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढू शकते.

(हे ही वाचा : १२ महिन्यांनी शनिदेवाच्या राशीत शुक्रदेव येताच ७ मार्चपासून ‘या’ राशींना मिळणार पैसा? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी )

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी केदार राजयोग वरदानच ठरु शकतो. सूर्यदेव या राशीच्या अष्टम स्थानी असून शनिदेव अकराव्या भावात भ्रमण करत आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करु शकता. कौटुंबातील वातावरण चांगलं राहण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तूळ राशी

केदार राजयोग तूळ राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरु शकतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभच लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात कौटुंबिक वातावरण आनंदी असू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)